दोन वर्षांपासून खोकला काही जात नव्हता, अखेर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आणि झालं असं की एका झटक्यात…

| Updated on: Jul 15, 2023 | 7:47 PM

माणसाला आजारपण हे काही सांगून येत नाही. काही आजार बरे होतात. तर काही आजार आयुष्यभर पाठ सोडत नाही. अशी प्रचिती अनेकांना आली आहे. पण गाझियाबादमधून आश्चर्यकारक घटना समोर आली आहे.

दोन वर्षांपासून खोकला काही जात नव्हता, अखेर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आणि झालं असं की एका झटक्यात...
दोन वर्षे खोकून खोकून दम गेला! घरगुती औषधंही फेल गेली, डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि ऑपरेशनच्या वेळी भलतंच घडलं
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us on

मुंबई : माणसाने वयाची साठी ओलांडली की आजारांचं फेरा सुरु होतो. पण काही व्यक्तींची जीवनशैली व्यवस्थित असेल तर मग आजारपण जवळपासही फिरकत नाहीत. पण एकदा आजार जडला की तो काही पाठ सोडत नाही अशीच प्रचिती अनेकांना येते. मग हे दुखणं ते दुखणं सुरु होतं. गाझियाबादमधील 85 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला असंच काहीशा आजाराने त्रस्त केलं होतं. दोन वर्षांपासून खोकल्याने पुरतं हैराण करून सोडलं होतं. खोकून खोकून जीव कासावीस झाला होता. धुम्रपानामुळे हा त्रास सुरु झाल्याचं अनेकांनी त्यांना सांगितलं. त्यांनाही ती गोष्ट पटली होती. त्यांनी धुम्रपानही सोडलं. पण त्यांना काही दिलासा मिळाला नाही.

जगमल यांना दोन वर्षांपासून श्वास घेण्याचा त्रास होत होता. तसेच खोकल्याचा त्रासही बळावला होता. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. 85 जगमल यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला तसेच रुग्णालयात दाखल झाले. तिने त्यांच्या छातीची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण खोकल्याचं खरं कारण जेव्हा समोर आलं तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

छातीचा रिपोर्ट आला तेव्हा डॉक्टरांसह घरचेही आश्चर्यचकीत झाले. कारण फुफ्फुसात चिकनचं हाड अडकलं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला.

जगमल यांनी दोन वर्षांपूर्वी चिकन खाताना जगमल यांनी हाड गिळलं होतं. पण त्या वेळेस त्यांना कोणताही त्रास झाला नाही. पण त्यानंतर हळूहळू त्रास वाढू लागला. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तसेच खोकला वाढू लागला होता.

डॉक्टरांनी जगमल यांच्या यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांच्या छातीतून हाड बाहेर काढलं आहे. तसेच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.