मुंबई : सोशल मीडियावर (Social media) कधी काय व्हायरल होईल हे कुणीचं सांगू शकत नाही. काही व्हिडीओ (viral video) असे असतात की, ते लोकांचं मन जिंकतात. सध्या जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो लोकांना अधिक आवडला आहे. एका व्यक्तीने सायकलला जुगाड (Desi Jugaad) करुन म्युझिक सिस्टीम लावली आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. लोकं त्या व्हिडीओला अधिक कमेंट करीत आहेत. काही लोकं जिथं सायकल उभी असते, तिथं जाऊन गाण्याचा आनंद घेत आहेत. हा व्हिडीओ अजून व्हायरल होण्याची शक्यता आहे. चालता फिरता डीजे लोकांना अधिक आवडत आहे.
सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने जुगाड केला आहे. त्या व्हिडीओ तुम्ही पुन्हा-पुन्हा पाहणार आहात. व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, त्या व्यक्तीने सायकलवरती सहा स्पिकरचा एक सेट व्यवस्थित लावला आहे. ते सगळे स्पिकर एकाचं कंपनीचे असल्यामुळे तो सेट दिसायला एकदम चांगला आहे. तो सेट अनेकांना आवडला असल्याचं लोकांनी कमेंटमध्ये सांगितलं आहे. ती सिस्टीम व्यवस्थित चालण्यासाठी त्या व्यक्तीने बॅटरी सुध्दा लावली आहे. त्या व्हिडीओत ती व्यक्ती कशा पद्धतीने स्पिकर लावून उभी आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे. हा जुगाड लोकांना अधिक आवडल्याचं लोकांनी कमेंटमध्ये सांगितलं आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती शेअर करण्यात आला आहे.’संयुक्त अरब अमीरात’ (UAE) नावाच्या इंन्स्टाग्राम खात्यावरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. २४ मे ला शेअर केलेल्या या व्हिडीओ आतापर्यंत 37 लाख व्यूज मिळाले आहेत. 1 लाख 44 हजार लोकांनी त्या व्हिडीओ लाईक केले आहे. व्हिडीओ पाहिलेले लोकं वेगवेगळ्या पद्धतीच्या कमेंट देत आहेत. एका व्यक्तीनं लिहीलं आहे, एखाद्या गोष्टीचा नाद असणं खूप मोठी गोष्ट आहे. दुसऱ्या एका व्यक्तीनं लिहिलं आहे की, ‘भाऊ बॅटरी मोठी ठेवायला पाहिजे’.