मुंबई : नुकताच रिलीझ झालेला जवान चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहीट ठरला. त्यामध्ये शाहरुख खानने (Shah Rukh Khan) मुख्य भूमिका केली आहे. जवान (Jawan) चित्रपटाने अनेक चित्रपटाचे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. त्याचबरोबर नवा रेकॉर्ड केला आहे. शाहरूखच्या चाहत्यांनी त्याचं आणि त्याच्या टीमचं देखील कौतुक केलं. 907.54 करोड रुपयांची कमाई त्या चित्रपटाने केली आहे. सध्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या (VIDEO VIRAL ON SOCIAL MEDIA) विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ लोकांना इतका आवडला आहे की, लोकांनी तो व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहिला आहे.
भारतात प्रत्येक अभिनेत्याचे चाहते आहेत. प्रत्येक चित्रपटावेळी प्रत्येक हीरोचा लूक वेगळा असतो. ती स्टाईल चाहते करण्याचा प्रयत्न करतात असं अनेकदा पाहायला मिळालं आहे. शाहरुख खानचे चाहते सुध्दा त्यामध्ये अजिबात पाठीमागे नाहीत. जवान चित्रपटातील लूक एका चाहत्याने केला आहे. त्यामुळं तो अधिक चर्चेत आला आहे.
शाहरुखच्या चाहत्याने, त्या व्हिडीओमध्ये ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी जवान चित्रपटासारखी कपडे घातली आहेत. तर डोक्याला बँडेज पट्ट्या गुंडाळल्या आहेत. तो तरुण ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी निघाला आहे. त्याचा व्हिडीओ एका व्यक्तीने काढला आहे. त्या व्हिडीओला कॅप्शनमध्ये जवानमधील लुक कसा वाटला त्यांनी कमेंटमध्ये विचारलं आहे.
त्या व्हिडीओची सुरुवात त्याने डोक्याला गुंडाळलेल्या पट्ट्यांपासून झाली आहे. त्या तरुणाचा चेहरा आणि हात पट्टीने गुंडाळला आहे. त्याचबरोबर तो मुलगा लंगडलंगड चालत आहे. त्याचबरोबर तो तरुण रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती बसला आहे. त्याचबरोबर तो तरुण ट्रेनमध्ये चढला आहे. त्याचबरोबर त्याला बसण्यासाठी जागा शोधत आहे. काहीवेळाने तो ट्रेनच्या सीटवर झोपलेला पाहायला मिळत आहे.
हा व्हिडीओ मागच्या पंधरा दिवसापूर्वी शेअर केला आहे. हा व्हिडीओ 1.8 मिलियन लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला अधिक कमेंट आल्या आहेत.