मुंबई : जे काही तरी वेगळे करतात त्यांची स्टोरी ऐकायला सगळ्यांना आवडते. त्याबरोबर त्यामध्ये कायतरी दिलचस्प असं असतं. त्यामुळे अशा स्टोरी (Special Story) वाचायच्या किंवा पाहायचं कोणी सोडत नाही. आज शिवम भारद्वाज या विषयी आपण चर्चा करणार आहोत. तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे. त्याचे व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहेत. ‘द गाय इन अ स्कर्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेला, शिवम एक फॅशन ब्लॉगर (Mumbai local) आहे आणि अप्रतिम मेकअप व्हिडिओ (Viral Video) शेअर करतो.
आता शिवमचे काही व्हिडीओ सोशल माीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. व्हिडीओत शिवमला मुंबईच्या लोकलमध्ये आणि मेट्रोच्या डब्ब्यात तुम्ही कैटवॉक करताना तुम्ही पाहू शकता. कारत अधिक व्हिडीओ तो रेल्वेमध्ये आणि मेट्रोमध्ये बनवत आहे. फ्लाई स्कर्ट आणि सनग्लासेस घातलेला शिवम चालण्याचा वेग कमी करतो. कारण प्रवासी त्याच्याकडे टक लावून पाहतात. काहींनी तर त्यांचे चालणे रेकॉर्ड केले.
त्या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लाईक आले आहेत. विशेष म्हणजे लोक शिवमची तारिफ करतात. या प्रतिभावान फॅशन ब्लॉगरसाठी जीवन नेहमीच खडतर राहिले आहे. महिलांचे कपडे घालत असल्यामुळे त्याला घरातून बाहेर काढले होते. मुंबईत राहण्यासाठी त्याने आतापर्यंत अनेकदा संघर्ष केला आहे.