चुकून खरेदी केली ही वस्तू, फ्री मध्ये मिळाली एक कोटींहून अधिक रक्कम

| Updated on: Oct 27, 2022 | 8:55 PM

नियती कधी कुणाच्या नशिबात काय देईल माहित नाही. कधी अचनाक एखादे संकट समोर येऊन उभे राहते. तर कधी कधी अचानक नशीब चमकते.

चुकून खरेदी केली ही वस्तू, फ्री मध्ये मिळाली एक कोटींहून अधिक रक्कम
लॉटरीच्या पैशाच्या हव्यासातून मुलाने आईला संपवले
Image Credit source: Representative image
Follow us on

आयुष्यात कधी काय घडेल हे आपण सांगू शकत नाही. नियती कधी कुणाच्या नशिबात काय देईल माहित नाही. कधी अचनाक एखादे संकट समोर येऊन उभे राहते. तर कधी कधी अचानक नशीब चमकते. असेच काहीसे अमेरिकेतील एका व्यक्तीसोबत घडले आहे. अमेरिकेतील एका व्यक्तीने चुकून लॉटरीची तिकिटे घेतली आणि विशेष म्हणजे त्याला ही लॉटरी लागलीही. ती ही थोडी थोडकी नव्हे, तब्बल एक कोटींहून अधिक रकमेची लॉटरी लागली.

चुकून तीन तिकिटे घेतली

मेरीलँड असे या व्यक्तीचे नाव असून, हा अमेरिकेतील रहिवासी आहे. मेरीलँड एका लॉटरीच्या दुकानात लॉटरीचे तिकिट खरेदी करण्यास गेला होता. यावेळी मेरीलँडने चुकून लॉटरीची तीन तिकिटे खरेदी केली.

चुकून खरेदी केलेल्या तिकिटाचा नंबर लागला

जेव्हा विजेत्यांची घोषणा झाली तेव्हा तोच नंबर लागला, ज्या नंबरचे तिकिट मेरीलँडने चुकून खरेदी केले होते. या लॉटरीतून मेरीलँडला एक कोटी 22 लाख रुपये मिळाले आहेत.

हे सुद्धा वाचा

याआधी एका ट्रक ड्रायव्हरलाही लागली होती लॉटरी

लॉटरी लागल्यानंतर मेरीलँडसह लॉटरी सिस्टम अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत. याआधी अमेरिकेतच एका ट्रक ड्रायव्हरने लॉटरी जिंकली होती. या चालकाच्या ट्रकचे ओडोमीटर तुटले होते. या तुटलेल्या ओडोमीटरवर एक नंबर होता. त्याने त्याच क्रमांकाचे तिकिट घेतले.

ट्रक ड्रायव्हरने केवळ गंमत म्हणून तिकिट खरेदी केले होते. पण हा नंबर त्याला करोडपती बनवेल याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती. लॉटरीचा निकाल आल्यावर चालक अचंबित झाला. कारण त्याने लाखो रुपये जिंकले होते.