VIDEO | देशी जुगाड करुन बनवलेल्या कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी एक व्यक्ती पोहोचला पेट्रोल पंपावर, आनंद महिंद्राने शेअर केला व्हिडिओ

| Updated on: Jun 12, 2023 | 3:29 PM

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीने देशी जुगाड करुन खाटेची गाडी तयार केली आहे.आनंद महिंद्रा यांनी सुध्दा व्हिडीओ शेअर केला आहे.

VIDEO | देशी जुगाड करुन बनवलेल्या कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी एक व्यक्ती पोहोचला पेट्रोल पंपावर, आनंद महिंद्राने शेअर केला व्हिडिओ
anand mahindra
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर (social media) अधिक सक्रीय असतात. ते त्यांना ज्या गोष्टी चांगल्या वाटतात, त्या शेअर करीत असतात. त्याचबरोबर काहीवेळेला लोकांना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी ते शेअर करीत असतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ लोकांना अधिक आवडला आहे. आनंद महिंद्र यांनी (anand mahindra latest tweet) एक व्हिडीओ त्यांच्या ट्विटरच्या अकाऊंटवरती शेअर केला आहे. त्यामध्ये एका व्यक्तीने जुगाड करुन खाटेला कार बनवली आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर १० जूनला शेअर केला होता. त्यामध्ये एका व्यक्तीने देशी जुगाड करुन एक वाहन तयार केलं आहे. त्याने खाटेला चार चाकं लावली आहेत. हा व्हिडीओ मंजरी दास नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, हा व्हिडीओ कमी कमी मला दहा लोकांना पाठवला आहे. हा व्हिडीओ लोकांचं लक्ष आपल्याकडे खेचण्यासाठी तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ अनेक नियमांचं उल्लघंन करीत आहे. परंतु खरं सांगतो की मी त्या अॅप्लिकेशन विषयी कधी विचार सुध्दा केलेला नाही असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओमध्ये एक व्यक्ती जुगाड केलेली गाडी घेऊन पेट्रोल टाकण्यासाठी आला आहे. देशी जुगाड केला आहे, खाटेला एक इंजिन आणि चार चाक लावली आहेत. विशेष म्हणजे खाटेला ताब्यात ठेवण्यासाठी एक स्टेरिंग सुध्दा लावण्यात आलं आहे. हा व्हिडीओ कधी तयार करण्यात आला आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. त्या पोस्टला हजारो लोकांनी लाईक केले आहे. विशेष म्हणजे त्या पोस्टच्या खाली विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. एक युजर म्हणतोय, कमालीचा जुगाड केला आहे.