video | ऑटोवाल्याचा भन्नाट जुगाड, उन्हाळ्यात प्रवासी गारगार

| Updated on: Jun 01, 2023 | 1:50 PM

ऑटो रिक्षा वाले आपल्या रिक्षात प्रवाशांच्या सुविधेसाठी निरनिराळे प्रयोग करीत असतात. आता सोशल मिडीया व्हायरल झालेल्या व्हिडीओत एका रिक्षा चालकाने वॉटर कुलर लावून प्रवाशांना दिलासा दिला आहे.

video | ऑटोवाल्याचा भन्नाट जुगाड, उन्हाळ्यात प्रवासी गारगार
Cooler Fitted In Auto Video
Image Credit source: socialmedia
Follow us on

दिल्ली : वाढत्या उन्हाच्या काहीलीने लोक त्रस्त असताना लोकांची प्रतिभाशक्ती देखील त्यावर उपाय शोधत असते. वाढत्या उष्म्यावर उपाय शोधण्यासाठी अनेक जण आपल्या परीने उपाय शोधत असतात. कोणी गाडीच्या छताला गायीचे शेण लावते. तरी कोणी गाडीच्या टपावर गवत लावते. आता सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून या व्यक्तीने आपल्या ऑटो रिक्षाला कूल ठेवण्यासाठी केलेला उपाय पाहून प्रवासी नक्कीच खुष होतील.

इंटरनेट युजरनी सोशल मिडीयावर अजब गजब व्हिडीओ पाहीले असतील. आता सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ पाहून तुम्ही या ऑटो रिक्षा वाल्याचा व्हिडीओ पाहून तुम्ही त्याच्या कल्पकतेला दाद द्याल. एका ऑटो रिक्षा चालकाने स्वत:चा आणि प्रवाशांचा उष्णते पासून बचाव करण्यासाठी चक्क रिक्षाच्या पाटीमागे एक वॉटर कुलर बसवल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. आपल्या प्रवाशाच्या प्रकृतीची काळजी वाहणाऱ्या ऑटो रिक्षावाल्याचा हा भन्नाट व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडीओने जिंकले मन

सोशल मिडीया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर हा भन्नाट व्हिडीओ खूप पाहीला जात आहे. या व्हिडीओ २२ मे रोजी शेअर केला गेला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला २ लाख ९१ हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. या व्हिडीओला पाहून इंटरनेट युजर एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने, ‘गर्मी में ठंडी का एहसास’. तर अन्य एका युजरने लिहीले आहे की, ‘भावाने पब्लिकचाही विचार केला आहे’.

येथे पाहा व्हिडीओ…