VIDEO : तुर्कीत भूकंपाच्या 128 तासांनंतरही ढीगाऱ्या खालून सहा महिन्यांच्या बाळाला सुखरूप बाहेर काढले

| Updated on: Feb 13, 2023 | 8:40 AM

तुक्री आणि सिरीयात निर्सगाच्या कोपानंतर निराशाजनक वातावरणात बचाव पथकाला सुखद धक्केही बसत आहेत. अनेक जण ढीगाऱ्या खालून इतक्या तासांनंतरही जीवंत सहीसलामत बाहेर येत आहेत.

VIDEO : तुर्कीत भूकंपाच्या 128 तासांनंतरही ढीगाऱ्या खालून सहा महिन्यांच्या बाळाला सुखरूप बाहेर काढले
BABY1
Image Credit source: socialmedia
Follow us on

दिल्ली :  तुक्री आणि सिरीया येथील भुंकपानंतर अनेक तास उलटूनही लोक ढीगाऱ्या खालूनही अजूनही सहीसलामत बाहेर येत आहेत. आतापर्यंत या भयानक भुकंपात 28,000 हजार जणांचे प्राण गेले आहेत. सहा हजाराहून अधिक इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या आहेत. भुंकपानंतरही अनेक धक्के बसत आहेत. परंतू निर्सगाच्या कोपानंतर निराशाजनक वातावरणात बचाव पथकाला सुखद धक्केही बसत आहेत. अनेक जण ढीगाऱ्या खालून इतक्या तासांनंतरही जीवंत सहीसलामत बाहेर येत आहेत. अशाच एका चमत्कारात एका अवघ्या सहा महिन्याच्या बाळा ढीगाऱ्या खालून सुखरूप बाहेर काढल्याचा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे.

तुर्कीच्या हताय मध्ये शनिवारी ढीगाऱ्या खालून एका सहा महिन्याच्या बाळाला सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. जेव्हा बचाव पथकाने त्याला बाहेर काढले तेव्हा उपस्थितांना टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला. भूकंपानंतर तब्बल128 तासानंतरही हे बाळ सुखरूप असल्याने चमत्कारच घडला आहे. या बाळाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर खूपच व्हायरल होत आहे.

 

कडाक्याची थंडी, अन्नपाण्यावाचून हे बाळ अशाप्रकारे वाचल्याने देव तारी त्याला कोण मारी असाच अनुभव बचाव पथकाला येत आहे. हजारो बचाव पथके या प्रतिकुल परीस्थितीत शोध मोहीम सुरू ठेवत लोकांना वाचवत आहेत. काही जण इतक्या तासांनंतरही जीवंत सापडत असल्याने बचाव पथकाच्या चेहऱ्यावरही समाधान झळकत आहे.

 

तुर्की मिडीयाच्या मते भूकंपाच्या पाच दिवसानंतर वाचवलेल्या लोकांमध्ये दोन वर्षांची एक मुलगी, सहा महिन्यांची गर्भवती महिला आणि एका 70 वर्षीय महीलेचाही समावेश आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्र बचाव प्रमुख मार्टीन ग्रिफिथ्स यांनी म्हटले आहे की तुर्की आणि सिरीयाच्या भूकंपातील बळींची संख्या सध्याच्या बळींच्या संख्येपेक्षाही ( संख्या 28,000) दुप्पट किंवा त्याहून जास्त होण्याचा अंदाज आहे. तुर्की आणि सिरीयात कमीत कमी 870,000 लोकांना तत्काळ गरम जेवणाची आवश्यकता असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की भूकंपाने 26 दशलक्ष लोक बाधित झाले आहेत.