Viral News : या गडावर शिक्षणासाठी वह्या पुस्तके घेण्यासाठी चिमुकली रविवारी पाणी, सरबत विकते, पर्यटकाने मांडली व्यथा

| Updated on: Feb 10, 2023 | 8:04 AM

आज हजारो पर्यटक गडकिल्ल्यांवर भटकंती करायला जातात खरे परंतु पाण्याच्या दोन बाटल्या घेऊन जाणं शक्य होत नाही. श्रेयाच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या या गाठोड्यात मी मोजल्या तर चक्क दहा भरलेल्या बाटल्या होत्या.

Viral News : या गडावर शिक्षणासाठी वह्या पुस्तके घेण्यासाठी चिमुकली रविवारी पाणी, सरबत विकते, पर्यटकाने मांडली व्यथा
श्रेया संतोष खरात
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर एक स्टोरी प्रचंड व्हायरल (fort viral story) झाली आहे. स्टोरी एका चिमुकलीची आहे. तीला शिक्षणासाठी (education story) आतापासून संघर्ष करावा लागत आहे. विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशी मिळालेल्या पैशातून पुढच्या शिक्षणाची तयारी सुरु केली आहे. तिच्याकडं असलेलं विक्रीचं सामान पाहून पर्यटक (tourist) भारावून गेले, त्याचबरोबर चिमुकलीच्या जिद्दीला सुद्धा त्यांनी सलाम केला आहे. फोटोत दिसणाऱ्या मुलीचं नाव श्रेया संतोष खरात (shreya santosh kharat) असं आहे. ती पाली गावची असल्याचं पर्यटकाने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याचबरोबर चिमुकलीचं घर जवळपास तोरण्याच्या सिमेवर आहे.

चिमुकलीच्या घरापासून पाली दरवाजाने राजगडावर पोहचायचे म्हटले तर खुप लांबचा प्रवास करावा लागतो. पर्यटकाला
मी सुवेळा माची ते संजिवनी माची हा ट्रेक करताना एका कातळ कड्यावरून त्य़ा चिमुकलीचं दर्शन झालं. ती संजीवनी माचीला वळसा घालून तोरणा मार्गाने वर चढत होती. जेमतेम सात ते साडेसात वर्षांचा जीव. डोक्यावर पाण्याच्या, सरबताच्या व ताकाच्या दहा ब्रिसलरी बाटल्या घेऊन चढत होती.

थोडावेळ हे दृश्य पाहून पर्यटक सुन्न झाला, मग कॅमेरामध्ये त्याने छायाचित्र घेतले. कड्यावरून तीला गाठायचेच हा पर्यटकाने निर्धार केला. किल्ले राजगडाच्या दक्षिणेकडील सुवेळा माची ते संजिवनी माची दरम्यानची संपूर्ण तटबंदी तुडवत तूडवत प्रदक्षिणा पूर्ण करत व इतिहासाच्या पाऊलखुणा मोबाईलमध्ये टिपत टिपत पर्यटकाने चिमूरडीला गाठले.

हे सुद्धा वाचा

तोपर्यंत श्रेया बरीच वर चढून आली होती. तिच्या जवळ पोहताच तीने आवाज दिला “दादा सरबत,पाणी, ताक घ्या की…” मी तिच्या डोईवरच गाठोड खाली घेत पर्यटकाने विचारलं बाळा कुठची राहणार, पाली गावच नाव सांगितलं. शाळेत जातेस का ? 2 री मध्ये जातेय सांगितले व शिक्षणासाठी वह्या पुस्तके घेण्यासाठी रविवारी पाणी, सरबत विकते निरूत्तर झालो व ह्रदयात कुठेतरी खोल जखम झाल्यासारखे वाटले. नाव विचारले तर श्रेया म्हणुन सांगितले. खरच हा प्रसंग जाणून घेताना डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या असल्याचं लेखकानं म्हटलं आहे.

आज हजारो पर्यटक गडकिल्ल्यांवर भटकंती करायला जातात खरे परंतु पाण्याच्या दोन बाटल्या घेऊन जाणं शक्य होत नाही. श्रेयाच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या या गाठोड्यात मी मोजल्या तर चक्क दहा भरलेल्या बाटल्या होत्या. पर्यटकाने सरबत मुद्दामहून जास्त पीलो, पाण्याच्या बाटल्या घेतल्या. पुढील एक वर्षांच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च येईल तेवढी रक्कम तिच्या हातात टेकवत तिचे गाठोड बांधत तिच्या डोईवर ठेवलं असल्याचं पर्यटकाने म्हटलं आहे.

ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून लोकांनी देखील कमेंटच्या माध्यमातून चिमुकलीच्या जिद्दीला सलाम केला आहे.