मुंबई : देशात काही राज्यात बिपरजॉय वादळामुळे (Cyclone Biparjoy) लोकांचं आणि निसर्गाचं बरचं नुकसान झालं आहे. बिपरजॉय वादळामुळे अनेक राज्यात भयानक स्थिती होती. ती व्हिडीओच्या (Cyclone viral video) माध्यमातून आपण सगळ्यांनी पाहिली, काही लोकांना त्या वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नवनवे व्हिडीओ (trending video) येत आहेत. ज्यावेळी वादळ आलं, त्यावेळी लोकांनी आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी काय काय केलं हे व्हिडीओत दिसतं आहे. हवेचा स्पीड इतका होता, की लोकांच्या घरावरील छतं उडून गेलं. काही लोकांची घरं मोडली.
सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ एका हॉटेलमधील वाटतं आहे. तिथं जेवण करण्यासाठी आलेली लोकं अडचणीत सापडली आहेत. त्यावेळी किती मोठं वादळं आलंय हे तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळत आहे. त्या हॉटेलमधील टेबल, खुर्ची सगळं काही बिस्कटलं आहे. काही लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या लोखंडी छताला पकडलं आहे. हवेचा स्पीड इतका आहे की, ज्या लोकांनी सुरक्षित रहावं म्हणून छताला पडकलं आहे, तो हवेत उडाला आहे.
हॉटेलचं छतं ज्यावेळी वादळामुळे हवेत उडालं, त्यावेळी त्याला पकडलेली लोकं सुध्दा हवेत उडाली. काही लोकांनी त्याचवेळी छतं सोडून दिलं. काही लोकं छतासोबत हवेत उडाली. त्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती त्या छतं सोडल्यानंतर जमिनीवर पडली. वादळ खूप भयानक होतं. त्यामुळे पुर्ण हॉटेलची व्यवस्था बिघडून गेली आहे. लोकं त्या हॉटेलच्या एका कोपऱ्यातून वादळ पाहत आहेत.
Si esto hubiera sido en mexico la historia fiera diferente,el mexicano promedio pesa unos 100 kilos??? pic.twitter.com/EimQiEbHl9
— El Chaman (@el_karadepapa) June 12, 2023
या व्हिडीओला @el_karadepapa ट्विटरवरून पोस्ट केली आहे. व्हिडीओला आतापर्यंत ३ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे. आतापर्यत या वादळाचं ठिकाणं समजलेलं नाही. या व्हिडीओचा आणि बिपरजॉय वादळाचा काहीही संबंध नाही.