दिल्ली : एलियनशी( aliens ) संपर्क झाल्याचा दावा अनेक जण करत असतात. मात्र, आता एलियनच्या भेटीला येणार आहेत. डिसेंबरमध्ये एलियन पृथ्वीवर अवतरणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. टाईम ट्रॅव्हलरने हा दावा केला आहे. तर, येत्या 25 वर्षात पृथ्वीवरच्या लोकांचा एलियनशी(aliens) डायरेक्ट कॉन्टॅक्ट होणार असल्याचा दावा चीनमधील पेकिंग विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ हेंग शू यांनी केला होता.
एलियनशी संपर्क झाल्याचा, युएफो म्हणजे उडत्या तबकड्या दिसल्याच्या अफवा नेहमीच ऐकायला मिळतात. आता एलियन पृथ्वीवर अवतरणार असल्याची चर्चेने जोर धरला आहे. एका स्वयंघोषित टाईम ट्रॅव्हलरने पृथ्वीवर एलियन येणार असल्याचा दावा केला आहे.
एनो अलारिकच्या व्यक्तीने आपण टाईम ट्रॅव्हलर असल्याचा दावा केला आहे. या स्वयंघोषित टाईम ट्रॅव्हलरने डिसेंबर महिन्यात पृथ्वीवर एलियन अवतरणार असल्याचे आपल्या दाव्यात म्हंटले आहे.
डिसेंबर महिन्यात एलियन पृथ्वीवर येऊन मानवाशी संवाद साधेल असेही या टाईम ट्रॅव्हलरचे म्हणणे आहे. 8 डिसेंबरला एलियन्स एका विशाल युएफओमधून पृथ्वीवर उतरतील असे या टाईम ट्रॅव्हलरने सांगितले आहे.