हुस्नाबाद | 7 सितंबर 2023 : आपण अनेकदा रस्ता माहिती नसला तर गुगल मॅपचा आधार घेत असतो. परंतू अनेकदा गुगल मॅपवर भरवसा करुन पत्ता शोधायला निघालेल्या वाहन चालकांना या सेवेने चांगलाच दणका दिला आहे. अशाच प्रकारे एका ट्रक चालकाने गुगल मॅपवर विश्वास ठेवून आपला ट्रक पुढे दामटला खरा, परंतू गुगल मॅपमध्ये दाखविलेला रस्ता प्रत्यक्षात जलाशयात घेऊन गेला. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले असावे असे वाटल्याने हा ट्रक चालक पुढे ट्रक चालवित गेला, परंतू केवळ दैवबलत्तर होते म्हणून त्याचे प्राण वाचल्याची घटना उघडकीस आली आहे.
गुगल मॅपच्या आधारे अनेकदा मुंबईत नवीन आलेले टॅक्सी चालक बिनधास्त आपली वाहने चालवित असतात. परंतू अशाप्रकारे तंत्रज्ञानाच्या ज्यादा आहारी गेल्याने काय परिणाम होतो ? याचा अनेकदा वाहन चालकांना फटका बसला आहे. एका ट्रक चालकाने अशाच प्रकारे गुगल रुट मॅपचा पत्ता शोधण्यासाठी वापर केला. गुगल मॅपवर रस्ता दाखविला जात होता. प्रत्यक्षात त्याचा ट्रन पाण्यात चालला होता. पावसाने पाणी साचले असावे अशा समजूतीत ट्रकचे चालक आणि क्लीनर राहीले. आणि पाणी केबिनच्या वरपर्यंत आल्याने त्यांना शंका आली. परंतू तोपर्यंत उशीर झाला होता आणि त्यांचा ट्रक पाण्यात अडकला.
तामिळनाडतून माल भरुन एक ट्रक चालक मंगळवारी रात्री चेरयालाच्या मार्गाने हुस्नाबादसाठी निघाला होता. चालक शिवा आणि क्लीनर मोंडैया यांनी नंदराम स्टेज पार केल्यानंतर एक सरळ रस्ता आहे. अंधारात रस्ता न समजल्याने त्यांनी गुगल मॅप उघडले. गुगल मॅपमध्ये दाखवल्या प्रमाणे ते निघाले परंतू ट्रक थेट पाण्यात गेला. त्यांना वाटले पावसाने रस्ता पाण्याने भरला आहे. परंतू पाण्याचे प्रमाण वाढतच असल्याने त्यांना संशय आला आणि त्यांनी गावकऱ्यांची मदत घेतली. अखेर स्थानिक लोकांनी दोरखंड बांधून ट्रक पाण्यातून कसाबसा काढला. जर त्यांनी गुगलप्रमाण मानूण ट्रक सुरुच ठेवला असता तर त्यांना कदाचित ट्रकसह जलसमाधी मिळाली असती. सिद्दीपेट जिल्ह्यातील गौरवेली जलाशयापर्यंत जाण्यासाठी गुगल मॅपची मदत घेतली तर अक्कन्नापेट मंडलच्या गुडातिपल्लीमध्ये निर्मित गौरवेली परियोजनेच्या पाण्यात गाडी जाते.