न्यूजर्सी | 5 जानेवारी 2023 : आपण जुळ्या मुलांचे अनेक किस्से ऐकले असतील. परंतू जुळ्या बाळाबद्दलची अनोखी हैराण करणारी घटना घडली आहे. जुळ्या मुलांच्या जन्माची ही अनोखी कहानी त्यांच्या पित्यानेच इंस्टाग्रामवर व्हायरल केली आहे. ही कहानी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटल्यावाचून रहाणार नाही. एका महिलेने जुळ्या मुलांना एक वर्षांच्या अंतराने जन्म दिला आहे. तुम्हालाही वाटेल असे कशी जुळी मुले एक वर्षांच्या अंतराने जन्मू शकतात. जुळ्या मुलांची ही कहाणी अशी घडली की दोघांचे जन्म साल वेगवेगळे निघाले आहे. या दाम्पत्यानेच जुळ्या मुलांची कहानी सोशल मिडीयावर शेअर केली आहे.
अमेरिकेतील न्यूजर्सी येथे रहाणारे एक दाम्पत्य ईव्ह आणि बिली हम्फ्रे यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. बिलीने गुड मॉर्निंग अमेरका या साईटवर दिलेल्या मुलाखतीत सांगितले की 31 डिसेंबरला त्यांची पत्नी ईव्ह हीला प्रसव कळा सुरु झाल्या. त्यानंतर ते त्यांच्या पत्नीला घेऊन रुग्णालयात गेले. 31 डिसेंबरच्या रात्री 11.48 वाजता त्यांच्या पहिल्या मुलगा एज्रा याचा जन्म झाला. त्यानंतर 40 मिनिटांनी साल 2024 उजाडल्यानंतर त्यांचा दुसरा मुलगा एजेकील 1 जानेवारी 12.28 वाजल्यावर जन्मला. बिली याने इंस्टाग्रामवर दोन्ही मुलांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिले आहे की ही जुळी भावंडे इतकी खास आहेत की त्यांच्या जन्माचे साल देखील एकच लिहू शकत नाही.
येथे पाहा INSTAGRAM POST –
बिली यांनी म्हटले आहे की आम्हाला माहीती होते की आम्हाला जुळी मुले होणार आहेत. परंतू दोघांच्या जन्मात 40 मिनिटांच्या अंतराने दोन्ही मुलांचे जन्म साल वेगवेगळे झाले. विशेष म्हणजे या मुलांचा 34 वर्षीय पिता बिली यांचा जन्मही 31 डिसेंबरचा आहे. त्यांनी म्हटले माझ्या पत्नीने मला हॅप्पी बर्थडेचे विश केले आणि म्हणाली आता मला लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन चल. हॉस्पिटलने देखील या अनोख्या जुळ्या मुलांचा फोटो शेअर केला आहे. या मुलांचा पिता बिलीने आनंदी होत म्हटले आहे की, मी देवाचे आभार मानतो की माझ्या एक मुलगा तरी माझ्या जन्म तारखेला जन्मला आहे. बिली आणि ईव्ह ज्यावेळी रुग्णालयात पोहचले तेव्हा त्यांचा तीन वर्षांचा एक मुलगाही सोबत होता. आता हे दोघे तीन मुलांचे पालक बनले आहेत.