सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ शेअर होत असतात. प्राण्यांच्या चित्रविचित्र हरकती लोकांना खूप भावतात. प्राण्यांच्या गमतीजमती पाहणे लोकांना फार आवडते. काही व्हिडिओ पाहून आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक चिंपांझी चक्क सिगारेट ओढताना दिसत आहे. याआधी एका माकडाचा वाईन आणि बिअर पितानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक चिंपांझी सिगारेट ओढत आहे. चिंपांझीचा हा गंमतीशीर व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. चिंपांझी आणि माकडांच्या शरीराची रचना माणसांसारखीच असते. यासोबतच तो माणसासारखा विचारही करू शकतो. हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हाला याची कल्पना येऊ शकते.
एक चिंपांझी पिंजऱ्यात बंद असलेला दिसत आहे. त्यादरम्यान पिंजऱ्याजवळ उभा असलेला एक माणूस चिंपांझीला सिगारेट ऑफर करतो. हा माणूस आपली सिगारेट दाखवत पिंजऱ्यातील चिंपांझीला सिगारेट तोंडात ठेवण्यासाठी इशारा करतो.
तो व्यक्ती सिगारेटच्या बॉक्समधून चिंपांझीला एक सिगारेट देतो. यानंतर तो व्यक्ती आपली सिगारेट पेटवल्यानंतर चिंपांझीची सिगारेट पेटवतो. यानंतर रोजच्या सवयीचे असल्यासारखे चिंपांझी सिगारेट ओढतो.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ खूप पाहिला जात आहे आणि शेअर होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत चार लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्स चिंपांझीला सिगारेट दिल्याबद्दल टीका करत आहेत.