VIDEO : गाडीच्या मागे महाकाय गेंडा लागला, पर्यटकांची पळता भुई थोडी; व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

| Updated on: Jan 03, 2023 | 12:25 AM

जवळपास तीन ते चार किलोमीटर गेंड्याने पाठलाग केला. त्यावेळी कुटुंबाने कशाप्रकारे आरडाओरड करून स्वतःचा प्राण वाचवला याचा थरार वायरल व्हिडिओतून पाहायला मिळत आहे.

VIDEO : गाडीच्या मागे महाकाय गेंडा लागला, पर्यटकांची पळता भुई थोडी; व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल
पर्यटकांच्या मागे गेंडा लागला अन्...
Image Credit source: social
Follow us on

जंगल सफारी म्हटलं की तिथे थरारक अनुभव येतोच. त्यामुळेच लायन सफारी असो किंवा टायगर सफारी, लोक या सफारीचे धाडस करताना अनेकदा विचार करतात. या सफारीला जायचे म्हटले की तुमच्याकडे प्रसंगावधान असण्याची फार गरज असते, नाहीतर किती मोठी फसगत होऊ शकते, याचा प्रत्यय सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओतून आला आहे. जंगलात अनेक धोकादायक प्राण्यांचे देखील वास्तव्य असते. ते प्राणी शक्यतो कुणाला इजा पोहोचवत नसतात मात्र त्यांच्या वाटेला कोणी गेला की ते प्राणी संबंधित लोकांची पाठ धरतात. वायरल व्हिडिओमध्ये असाच एक महाकाय गेंडा एका पर्यटक कुटुंबाच्या मागे लागला आहे. त्या गेंड्याने जंगल सफारीला गेलेला कुटुंबाच्या पायाखालची वाळू सरकवली.

गेंड्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी कुटुंबाला पळता भुई थोडी झाली. जवळपास तीन ते चार किलोमीटर गेंड्याने पाठलाग केला. त्यावेळी कुटुंबाने कशाप्रकारे आरडाओरड करून स्वतःचा प्राण वाचवला याचा थरार वायरल व्हिडिओतून पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

व्हिडिओ पाहून अंगावर काटाच उभा राहतो

गेंड्याने केलेला पाठलाग इतका थरारक आहे की या घटनेचा व्हिडिओ पाहणाऱ्याच्या देखील अंगावर काटे उभे राहत आहेत. जंगल सफारीवर असताना असा भयानक प्रकार घडला तर काय होईल, याची कल्पना न केलेली बरीच.

गेंडा असो किंवा वाघ, सिंह यापैकी कुठलाही एक प्राणी मागे लागला तर किती गंभीर परिस्थिती उद्भवते, हे व्हिडिओतून स्पष्ट होत आहे. सुदैवाने हे पर्यटक गाडीमध्ये आहेत आणि त्यांच्या गाडीने भलताच वेग पकडून गेंड्याला मागे टाकले आहे.

गेंडाही सुसाट वेगाने आपला मागून येत असल्याचे पाहून कुटुंबीयांची भलतीच घाबरगुंडी उडाली आहे. गेंडा जसा जवळ येतोय तोच तसा ड्रायव्हरला आपल्या गाडीचा वेग आणखी वाढवण्याची सूचना कुटुंबीयांकडून दिली जाते. एकूणच जीवाच्या आकांताने कुटुंबाचा बचाव लढा सुरू आहे.

जंगल सफारीवर जाताय तर जरा जपून…

महाकाय गेंड्याचा व्हिडिओ पाहून जंगल सफारीवर जाणारे लोक चांगलेच सावध झाले आहेत. यापुढे लायन किंवा टायगर सफारीवर जाताना पुरेशी काळजी घ्या, असे आवाहन वनखात्यासह प्राणीप्रेमींकडून केले जात आहे.

सध्या जंगलाच्या क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढत चालली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी प्राण्यांच्या अधिवासावर गदा आली आहे. अशा परिस्थितीत प्राणी जंगलातून मनुष्यवस्तीकडे मोर्चा वळवत आहेत. त्यामुळे जंगल सफारीवर जाणाऱ्या लोकांनी विशेष खबरदारी घेतली पाहिजे, असे मत वन्यजीव तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.