सोशल मीडियावर लहान मुलांच्या कलाकारीचे, मस्तीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर कधी कधी प्रसिद्धीसाठी केलेल्या स्टंटबाजीचे व्हिडिओ असतात. सध्या अशाच एका व्हिडिओची चर्चा सोशल मीडियात (Social Media) सुरु आहे. हा व्हिडिओ एका सात वर्षाच्या मुलाचा असून, हा मुलगा व्हिडिओत पायलटच्या सीटवर (Pilot Seat) बसून चक्क विमान चालवताना (Boy operating aeroplane) दिसत आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजली आहे.
हा व्हिडिओ सूरतमधील असल्याचे बोलले जात आहे. व्हिडिओ @Jitendray050691 या अकाउंटवरुन ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. सात वर्षाचा मुलगा पायलट सीटवर बसून रनवे वर विमान चालवताना व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून हे सुरक्षा मानकांचे उल्लंघन असल्याचे म्हटले जात आहे.
सूरत एयरपोर्ट पर एक बच्चे को चलते विमान की पायलट सीट पर बैठा देखा गया. वीडियो को देख सुरक्षा मानदंडों के उल्लंघन पर चिंता जताई जा रही है.#Viral #Pilot pic.twitter.com/s7EmzBPXO1
— Jitendra Yadav جتندر (@Jitendray050691) October 14, 2022
मुलाच्या शेजारी बसलेली व्यक्ती मुलाला विमान चालवण्याबाबत सूचना देत असल्याचे व्हिडिओत ऐकू येत आहे. मुलाला पायलट सीटवर बसवून विमान चालवण्यास देणे हे केवळ नियमांचे उल्लंघन नाही तर सुरक्षा मानकांच्या विरोधात आहे.
हा व्हिडिओ सुरतमधील असून व्हिडिओतील हे विमान सिंगल इंजिन आहे. मुलाने एव्हिएशन हेडसेट घातला आहे आणि स्टीयरिंग व्हील धरलेला दिसत आहे. यावरुन हे स्पष्ट होते की, हे मूल फक्त फोटोग्राफीसाठी तिथे बसले नव्हते. मुलाचा छंद पूर्ण करण्यासाठी लोक नियमही धाब्यावर बसवताना दिसत आहेत.