जगात अनेक प्रतिभासंपन्न लोकं आहेत. हे लोक आपल्या कलांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. हे व्हिडिओ लोकांनाही खूप आवडतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी एका हाताने एकाच वेळी देशातील 15 महापुरुषांचे फोटो काढत आहे. व्हिडिओ पाहून सर्वच थक्क होत आहेत.
प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हे कसे शक्य आहे हे समजण्यापलिकडे आहे, असे महिंद्रा यांनी म्हटले आहे.
How is this even possible?? Clearly she’s a talented artist. But to paint 15 portraits at once is more than art—it’s a miracle! Anyone located near her who can confirm this feat? If valid, she must be encouraged & I’d be pleased to provide a scholarship & other forms of support. pic.twitter.com/5fha3TneJi
— anand mahindra (@anandmahindra) October 27, 2022
ही एक प्रतिभाशाली कलावंत आहे. मात्र एकाच वेळी 15 चित्रे बनवणे कलेपेक्षा अधिक आहे. हा एक चमत्कार आहे. या मुलीचा शोध घेतला पाहिजे. तसेच शिष्यवृत्ती आणि इतर मदत देण्यास मला आनंद होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
या व्हिडीओमध्ये एक मुलगी एका रुंद बोर्डवर हे फोटो काढत आहे. यासाठी, ती लाकडाचे काही छोटे छोटे तुकडे एकत्र जोडते आणि त्यांना घट्ट बांधते आणि त्यांच्या टोकाला स्केचेस जोडते. यानंतर ती संपूर्ण लाकडी बॉक्स पकडून फिरवायला लागते. डॅशबोर्डवर हळूहळू चित्र तयार होऊ लागते.
व्हिडिओमध्ये मुलीने एका हाताने एकूण 15 महापुरुषांची छायाचित्रे बनवली आहेत. विवेकानंद, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदि महापुरुषांचा समावेश आहे.
या व्हिडीओमध्ये मुलीने गिनीज बुकमध्ये नाव नोंदवल्याचा दावा केला जात असला तरी याला दुजोरा मिळालेला नाही. नूरजहाँ असे या मुलीचे नाव सांगण्यात आले आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.