लग्न म्हटलं की अगदी घरापासून लग्नाच्या हॉलपर्यंत भारी उत्साह असतो. नात्यातली मंडळी लग्नाच्या मंडपापासून जिथे मिळेल, तिथे ठेका धरायला सुरुवात करतात. काहीजण नागीन डान्स (Nagin Dance) करतात आणि उपस्थितांची वाहवा मिळवतात. ग्रामीण भागात तर वाजंत्री मंडळीही डान्स करून त्यांची कौशल्ये दाखवतात. सोशल मीडियात (Social Media) अशाच एका व्हिडिओने सध्या करमणुकीचे अक्षरशः थैमान घातलंय. हा व्हिडिओ (Video) आहे एका तरुणाचा, जो लग्नाच्या हॉलमध्ये सुरुवातीला शांत बसला होता अन् अचानक त्याने विचित्र ठेका धरला.
तरुणाच्या अंगात जणू भूत संचारल्यासारखा तो बेभान होऊन नाचू लागला. लग्नाच्या हॉलमधील इतर मंडळींना धक्के देत त्याने विचित्र डान्स सुरू ठेवला. त्याच्या या विचित्र ठेक्याने लग्न मंडपात हलकल्लोळ उडवलाच, परंतु त्यानंतर सोशल मीडियात त्याच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
जगात भूत अस्तित्वात आहे की नाही? याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. अनेकांना आपण कधी भूत पाहिलेय का? असं विचारलं, तर उत्तर नाहीच मिळतं. पण काहींना आलेल्या कटू अनुभवातून भूत अस्तित्वात असल्याची प्रचिती येते. सोशल मीडिया व्हायरल झालेल्या व्हिडिओमधूनही तरुणाच्या अंगात जणू भूत संचारले की काय? अशी शंका अनेकांच्या मनात डोकावली आहे.
लग्नाच्या हॉलमध्ये एक तरुण खुर्चीवर शांतपणे बसला होता. हॉलमध्ये इतरत्र उत्साही वातावरण होते. सगळेजण लग्नाच्या उत्साहात रंगले होते. अशातच शांत बसलेला तरुण खुर्चीवरून उठला आणि विचित्र पद्धतीने नाचू लागला. त्याच्यासमोर बरेच तरुण उभे आहेत, याचे भानही त्याला नव्हते. त्याने दोन्ही हातांनी धक्के देत लोकांना बाजूला ढकलले.
पायाखाली खुर्ची होती, त्याचीही त्याला कल्पना नव्हती. यादरम्यान तो स्वतःच खाली कोसळला. विशेष म्हणजे त्यानंतरही त्याने स्वतःचा डान्स सुरूच ठेवला होता. अखेर लग्नाच्या हॉलमधील बाकी तरुणांपैकी दोघेजण पुढे येतात आणि त्याला आवरण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडिया व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे सगळं दिसत आहे.
सोशल मीडिया तुफान करमणूक
तरुणाच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियात instagram वर शेअर करण्यात आला आहे. यावर सोशल मीडियातील युजर्सनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. अनेक जण पुन्हापुन्हा हा व्हिडिओ पाहून स्वतःची करमणूक करून घेत आहेत.