आजकाल कुठल्याही गोष्टी गुप्त राहत नाहीत. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. त्यामुळे कुठलीही अनोखी गोष्ट दिसली की, ती गोष्ट मोबाईलमध्ये कैद करण्याचा मोह कोणालाही आवरत नाही. मग अनेकदा ते व्हिडिओ सभोवताली दिसणाऱ्या प्राण्यांचे असतात किंवा सभोवतालच्या मनमोहक निसर्गाचे. याचदरम्यान काही व्हिडिओ भलतेच चर्चेत (Some videos are popular) येतात. कारण त्या व्हिडिओमध्ये काही ना काही मजेशीर गोष्टी (Funny things) अनुभवायला मिळतात. सोशल मीडियामध्ये गेल्या काही दिवसांत व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये बिहारच्या रुग्णालयातील व्हिडिओने (Bihar Hospital Video Viral) देखील चांगलीच बाजी मारली आहे.
एका रुग्णालयाच्या बंद खोलीमध्ये तिथली नर्स दोघांची लाकडी दांड्याने चांगलीच धुलाई करत आहे. तिथल्या लोकांनी या धुलाईचा आनंद घेतला असणारच, पण सध्या हाच व्हिडिओ सोशल मीडियातील युजर्सचीही मोठी करमणूक करीत आहे.
लोकांना कुठेही काही चुकीचे दिसले की लोक सर्वात आधी मोबाईल पुढे करून त्याचा व्हिडिओ बनवतात किंवा क्लिक करतात. अनेकदा छुप्या पद्धतीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न यशस्वी होतो.
मात्र जर एखादा व्यक्ती व्हिडिओ बनवत असल्याचे संबंधित चूक करणाऱ्या व्यक्तीला कळले, तर त्या व्यक्तीचा पारा भलताच चढतो. मग ती व्यक्ती काहीही करायला तयार होते. बिहारमधल्या दोघांच्या वाट्यालाही असाच कटु अनुभव आला.
या दोन मुलांनी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला अन् हाच प्रयत्न त्यांच्या चांगलाच अंगलट आला. रुग्णालयातील नर्सने दोघांनाही खुर्चीवर बसवून त्यांची दांड्याने धू-धू धुलाई केली.
Two Boy Were Beaten Up By Nurses In Hospital #Bihar. Know What Was The Matter. Read Here..https://t.co/M3t2YVISfz#VideoViral pic.twitter.com/X0m7sh7x5f
— Akshay Pandey (@akshay019) October 16, 2022
दोन्ही युवक छपरा सदर रुग्णालयात मेडिकल सर्टिफिकेट बनवण्यासाठी आले होते. रुग्णालय कर्मचाऱ्यांकडून सर्टिफिकेट वेळेपर्यंत त्या दोघांनी आवारात फेरफटका मारला. त्यावेळी त्यांना त्या रुग्णालयातील गैरसोयी लक्षात आल्या.
तरुणांनी लगेच खिशातील मोबाईल बाहेर काढून त्या घरचे व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. ही बाब रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कळताच एका नर्सने त्यांना चांगलाच झटका दिला. दोघांना रुग्णालयातील एका रूममध्ये बंद करण्यात आले.
यानंतर नर्सने त्यांना दांड्याने मारहाणीचा प्रसाद दिला. यापुढे आमच्या हातून चूक होणार नाही, हात जोडतो, अशी विनवणी दोघांनी केली. दोघे टाळ्यावर आल्याचे दिसल्यानंतरच नर्सने आपल्या हातातील दांडा खाली ठेवला. नंतर दोन्ही युवक अंग चोळत रुग्णालयातून बाहेर गेले.
तरुणांचा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.