नवी दिल्ली : आई होणे हे प्रत्येक मातेसाठी एक सुखद स्वप्न असते, परंतू काही वेळा देव देतो तर छप्पर फाडे के देतो अशी अवस्था एका मातेची झाली आहे. एका महिलेला चक्क एकाच वेळी पाच मुले झालेली आहेत. विशेष म्हणजे 37 वर्षांची या महिलेला आधीच सात मुले आहेत. या दाम्पत्याची आणखी मुल व्हावे अशी इच्छा होती. कुठे घडली आहे ही अजब घटना हे पाहूया..
एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहीती प्रमाणे पोलंडला राहणाऱ्या एका 37 वर्षीय महिलेला एकाच पाच मुले झाली आहेत. विशेष म्हणजे या महिलेला आधीच सात मुले आहेत.
डोमिनिका क्लार्क यांना प्रेग्नंसीच्या 28 व्या आठवड्यात पाच मुले झाली आहेत. या महिलेची प्रसुती नैसर्गिक नसून तिला ही मुले सिजेरीयन करून झाली आहेत. जन्म झालेल्या सर्व बाळांचे वजन 710 ते 1400 ग्रॅम दरम्यान आहे. विशेष म्हणजे या महिलेला आधीच सात मुले आहेत.
या महिलेची प्रसुती वेळे आधीच झाली आहे. परंतू सर्व बाळांचे आरोग्य उत्तम आहे. सर्व मुलांना ब्रिदींग सपोर्टवर ठेवले आहे. या मुलांचे इतर भाऊ दहा महिन्यांपासून 12 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील आहेत. त्यांची आई क्राको म्हणतेय जशी आशा बाळगली होती त्यापेक्षा जास्त चांगले वाटत आहे. जगात आपल्याला आनंदी आणि सकारात्मक रहायचे असेल तर आपल्याकडे खूप मुले असायला हवीत असे मुलांच्या आईला वाटते आहे. मुलांमुळे आपले आयुष्य आनंदात आणि चांगले जाते असे त्यांनी म्हटले आहे.
अनेक मुले होण्याचे काय कारण
ज्यादा मुले होणे म्हणजेच मल्टीपल प्रेग्नंसी होय. जेव्हा दोन मुले होतात तेव्हा जुळे किंवा ट्वीन्स म्हटले जाते. तीन मुले झाली की ट्रीपलेट म्हटले जाते. पण जेव्हा सहा किंवा सात मुले होतात तेव्हा त्याला सेक्स्टुपलेट म्हटले जाते.
एकापेक्षा जास्त मुले जेव्हा होतात त्यास मल्टीपल प्रेग्नंसी म्हटले असले तरी त्याचे कारण फर्टीलाइज्ड अंडबिजामध्ये असते. ज्यावेळी अंडबिज गर्भाशयाच्या पिशवित विभाजित होण्यापूर्वीच फलित होते. किंवा दोन किंवा अधिक अंडबिजे वेगवेगळ्या शुक्रांणूद्वारे फलित होतात. तेव्हा मल्टीपल प्रेग्नसी होते. मल्टीपल प्रेग्नसीत मुले आयडेंटीकल किंवा फ्रॅटरनल जुळी होतात. आयडेंटीकल मुले एकाच लिंगाची आणि दिसायला एकसारखीच असतात. फ्रॅटरनल जुळी मुले वेग -वेगळी दिसू शकतात.