नवी दिल्ली | 17 सप्टेंबर 2023 : हल्ली अगदी तरुण वयात आलेल्या हृदय विकाराच्या धक्क्याने झालेले मृत्यू पाहून चिंता व्यक्त केली जात आहे. हृदय विकाराचे वाढते प्रकार आजच्या ताणतणावाच्या जीवनशैलीची देण असल्याचं म्हटलं जात आहे. युपीच्या गाजियाबाद जिल्ह्यात ट्रेड मिलवर धावताना एका अवघ्या 21 वर्षीय तरुणाला हृदय विकाराचा झटका आल्याने तो जागीच कोसळल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तरुणांनी आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी असे हा व्हिडीओ पाहून युजर प्रतिक्रीया देत आहेत.
युपीच्या गाजियाबाद जिल्ह्यातील खोडाच्या सरस्वती विहार परिसरातील शनिवारी सिद्धार्थ नावाच्या तरुणाला ट्रेड मिलवरच हार्ट ॲटॅक आला. हा धक्का इतका तीव्र होता ही सिद्धार्ध जागीच कोसळला. त्याला त्याच्या सहकाऱ्याने नजीकच्या दवाखान्यात नेले. परंतू तोपर्यंत सर्व खेळ संपला होता. डॉक्टरांनी सिद्धार्थला तपासून मृत घोषीत केले.
व्हायरल व्हिडीओत तूम्ही पाहू शकता की सिद्धार्थ जिमच्या ट्रेड मिलवर व्यायाम करीत होता. अचानक तो थांबताना दिसत आहे. त्यानंतर तो मुर्च्छीत होऊन तेथेच कोसळताना दिसत आहे. जिममधील सहकारी हे पाहून त्याच्याकडे धावतात. त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला जातो. परंतू त्यात यश येत नाही. हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने त्याचे निधन होते. सिद्धार्थ त्याच्या आई-वडीलांचा एकुलता एक मुलगा होता. तो नोएडा येथील एक इंजिनिअरिंग कॉलेजात प्रथम वर्षाला होता.
हाच तो गाजियाबादचा व्हायरल व्हिडीओ –
#Ghaziabad: खोड़ा थाना क्षेत्र के सरस्वती विहार में जिम करते करते 19 साल के युवक सिद्धार्थ की ट्रेडमिल से गिरकर मौत…
जबसे वैक्सीनेशन हुआ है तबसे युवाओं में हार्टअटैक की घटनाएं बढ़ती ही जा रही हैं?pic.twitter.com/8Ut2mszxj4
— Ali Sohrab (@007AliSohrab) September 16, 2023
पोलिसांना या प्रकरणात कोणतीही तक्रार आलेली नाही. सिद्धार्थचे पालकांनी त्याचा मृतदेह घेऊन बिहारला सिवनला अंत्यसंस्कारासाठी गेले आहेत. सिद्धार्थ आपल्या वडीलांसह खोडा कॉलनीत रहात होता. त्याच्या पश्चात वडील विनय कुमार आणि आई तसेच अन्य सदस्य आहेत. त्याची आई बिहारमध्ये शिक्षिका आहे. त्यांचा तो एकुलता एक मुलगा होता. याच वर्षी त्याने पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता.