मुंबई | 18 मार्च 2024 : लोकल ट्रेनचा प्रवास करताना सुरक्षित प्रवास करावा, स्वत:चा किंवा इतरांचा जीव धोक्यात घालू नये असे आवाहन रेल्वे प्रशासन सतत करीत असते. तरीही मोबाईल रिल्स बनवून तथाकथित प्रसिद्धी मिळण्यासाठी तरुणांकडून स्वत:चा जीव धोक्यात घालणे सुरुच आहे. आता असाच एक लोकलच्या दाराशी लटकून स्टंट करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून युजरनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. मोबाईलवर रिल्स बनविण्याच्या नादात तरुण पिढीने असा जीव धोक्यात घालू नये यासाठी अशा घटनांविरोधात पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
मुंबई उपनगरीय लोकलचा प्रवास करताना दरदिवशी सरासरी आठ ते दहा प्रवाशांचा अपघातात मृत्यू होत असतो. त्यात लोकलचे रुळ ओलांडतान सर्वाधिक मृत्यू होत असतात. मुंबई उपनगरीय लोकलचा प्रवास करताना सावधानता बाळगण्याची गरज असल्याचे रेल्वे सातत्याने अनाऊन्समेंट करून सांगत असते. तरीही काही तरुण प्रसिद्धीसाठी मोबाईलवर रिल्स तयार करण्यासाठी स्टंट करतानाचे व्हिडीओ अधून मधून सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यात एक तरुण लोकलच्या दरवाजात लटकून फलाटावर चपला घासत चाललेला दिसत आहे. या तरुणाचा जरासा देखील तोल गेला असता किंवा हात सटकला असता तर त्याचा मृत्यू देखील होऊ शकला असता. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून युजरने संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत.
येथे पाहा व्हिडीओ –
Bhai slipper kis company ke hain bass yah bata de 🥹😭 pic.twitter.com/0J22DfEgwH
— Introvert //🙇🏻♂️ (@introvert_hu_ji) March 17, 2024
या व्हिडीओला एक्सवर ( आधीचे ट्वीटर ) @introvert_hu_ji या अकाऊंटने शेअर केले आहे. या व्हिडीओला तीन लाखांहून अधिक लोकांनी पाहीले आहे. अनेकांना यावर प्रतिक्रीया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहीले आहे की अरे भावा असे करण्यामागे तुझी काय मजबूरी आहे. तर दुसऱ्या एका युजरने लिहीले आहे की अशा प्रकारचा स्टंट याचे प्राण देखील घेऊ शकतो. अशा अनेक युजरनी वेगवेगळ्या प्रतिक्रीया लिहील्या आहेत.