तिरुअनंतपुरम : म्हणतात की मरण कधी कुणाला सांगून येत नाही. मृतावस्थेत निपचित पडलेला माणूस कधी अचानक खाडकन जागी होतो. तर कधी धडधाकट बलशाली पैलवान अकस्मातपणे अनंताच्या प्रवासाला निघाल्याची बातमी आपल्या कानावर धडकते. तर कधीकधी अशा काही घटना समोर येतात; ज्या बघून किंवा ऐकून आपण थक्क होतो. (accident of old women in Kerala viral video)
केरळमधील कोझिकोड-पलक्कड या राष्ट्रीय महामार्गावरील थोडुकप्पू येथे अशीच एक घटना घडली आहे. या महामार्गावर एक म्हातारी आजीबाई भीषण अशा अपघातातून (accident of old women) बचावली आहे. विशेष म्हणजे अंगावरुन ट्रक गेलेला असताना या आजीबाईच्या अंगाला खरचटलंसुद्धा नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ही आजीबाई कोझिकोड-पलक्कड या महामार्गावरुन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जात होती. याच वेळी समोरच्या बाजूने एक ट्रक भरधाव येत होता. आला. वळणाचा रस्ता असल्यामुळे ट्रकचालकाला समोर आजीबाई असल्याचे दिसले नाही. परिणामी ही आजीबाई थेट ट्रकखाली आली. हा अपघात झाल्यानंतर काहीतरी अघटित घडल्याची धडकी प्रत्येकाच्या मनात भरली. ट्रक अंगावरुन गेल्यानंतर सर्वांनी आजीबाईकडे धाव घेतली. मात्र, या अपघातात आजीबाई बचावली. तिच्या अंगावर खरचटलंदेखील नाही.
Elderly #Indian woman run over by truck miraculously escapes unscathed pic.twitter.com/AFGq2uYf3e
— CGTN (@CGTNOfficial) December 6, 2020
दरम्यान, हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यानंतर 54 सेंकदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला गेला. शेअर करताच हा व्हिडीओ फेसबुक आणि ट्विटरवर हा चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, एकीकडे म्हाताऱ्या आजीबाईचा जीव वाचल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तर, ट्रकचालकाच्या सैराट वृत्तीमुळे त्याच्यावर कारवाईची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
ताडोबा फिरायला निघालेल्या पर्यटकांच्या गाडीला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
किड्यांचा मारा चुकवताना विचित्र अपघात, सांगलीतील आयर्विन पुलावर किड्यांचा भडिमार
लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात; चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू
(accident of old women in Kerala viral video)