VIDEO | सिद्धटेकच्या मंदिराबाहेर गणेशभक्तांशी हस्तांदोलन, गोंडस कुत्र्याचा व्हिडीओ पाहिलात?

| Updated on: Jan 12, 2021 | 3:50 PM

सिद्धिविनायक मंदिराबाहेर पडताना पायऱ्यांजवळ बसलेला हा कुत्रा भाविकांसोबत शब्दशः शेकहँड करत होता. (Stray Dog Siddhivinayak Temple Siddhatek)

VIDEO | सिद्धटेकच्या मंदिराबाहेर गणेशभक्तांशी हस्तांदोलन, गोंडस कुत्र्याचा व्हिडीओ पाहिलात?
Follow us on

मुंबई : कुत्रे-मांजरी यासारख्या प्राण्यांचे व्हिडीओ अनेकदा आपलं लक्ष वेधून घेतात. कंटाळवाण्या दिवस अखेरीस ‘हसऱ्या’ कुत्र्याचा एखादा व्हिडीओ तुमचाही मूड आनंदी करत असेल. सिद्धटेकच्या सिद्धिविनायक मंदिराबाहेरील एका भटक्या कुत्र्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर भाव खाऊन जात आहे. देवळाबाहेर पडणाऱ्या भक्तांना हस्तांदोलन करणाऱ्या या कुत्र्याच्या व्हिडीओवर नेटिझन्सच्या उड्या पडल्या आहेत. (Adorable Stray Dog Greets Devotees at Siddhivinayak Temple Siddhatek)

कुठला आहे हा व्हिडीओ?

अरुण लिमाडिया (Arun Limadia) नावाच्या फेसबुक यूझरने हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे. अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धिविनायकाच्या मंदिराबाहेरचा हा व्हिडीओ. अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धटेकमध्ये गणपतीचे मंदिर आहे. देवळातून बाहेर पडताना पायऱ्यांजवळ बसलेला हा कुत्रा भाविकांसोबत शब्दशः शेकहँड करत होता.

दोन दिवसात लाईक्सचा पाऊस

अवघ्या दोन दिवसात हा व्हिडीओ इंटरनेट सेन्सेशन ठरला. कारण काही तासांतच या व्हिडीओवर 14 हजारांपेक्षा जास्त लाईक्स आले आहेत. तर 25 हजारांपेक्षा जास्त यूझर्सनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. कुत्र्याच्या क्यूटनेसवर कमेंट बॉक्समध्ये प्रेमाचा वर्षाव झाला आहे.

कमेंटमधून कुत्र्याचं कोडकौतुक

“कुत्रे प्रामाणिक असतातच, मात्र गोडही असतात” अशी कमेंट कोणी केली आहे, तर देवाचे आशीर्वाद लाभलेला कुत्रा अशा शब्दात कुणी या कुत्र्याचं वर्णन केलं आहे. काही जणांनी हा कुत्रा पाळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर काही यूझर्सनी आपल्या मित्र मंडळींना टॅग करुन असाच एखादा कुत्रा शोधण्याची गळही घातली आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

सरपंचाचं डोकं फिरलं, कुत्र्याच्या नावावर 18 एकर जमीन केली, असं का घडलं?

(Adorable Stray Dog Greets Devotees at Siddhivinayak Temple Siddhatek)