संवेदना ह्या फक्त काही माणसांमध्ये असतात असे नव्हे. इतर प्राणीमात्रांमध्ये देखील संवेदना पाहायला मिळतात. तुम्ही हंस पक्षी अवश्य पाहिला असेल. काळा किंवा सफेद रंगाचा हा पक्षी त्याच्या सौंदर्याने अनेकांना प्रेमात पडतो. कित्येक पक्षी प्रेमींना या हंसाच्या सौंदर्याची भुरळ असते. याच सर्वात सुंदर अशा पक्ष्याचा मनमोहक असा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा पक्षी पाण्यामध्ये विहरत असताना आपल्या चोचीमधून दाणे टिपत ते पाण्यातील माशांना खाऊ घालतोय. माशांप्रती त्याने दाखवलेली संवेदना सर्वांच्याच कौतुकाचा विषय बनली आहे.
हंस पक्ष्याची समजूतदार पशुपक्षांमध्ये मोजदाद केली जाते. हा पक्षी विशेषतः आफ्रिका आणि अंटार्टिका वगळता जगाच्या कानाकोपऱ्यात सर्व ठिकाणी आढळतो. या पक्ष्याच्या अनेक प्रकारच्या प्रजाती आहे.
सर्वच प्रजातींमध्ये काही समान स्वभावधर्म आहेत. समजूतदारपणा तसेच इतर प्राण्यांबद्दलची संवेदना हा त्यापैकीच एक समान स्वभावधर्म आहे. हंस पक्षी शांत स्वभावाचा मानला जातो मात्र ज्यावेळी अंडी आणि पिल्लांच्या सुरक्षेचा मुद्दा येतो, त्यावेळी हा पक्षी आक्रमक रूप घेतो.
हंस आणि मासे हे दोघेही पाण्यात विहरणारे. सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये या दोघांमधील अनोखी जवळीक पाहायला मिळत आहे. हंस पक्षी सहसा इतर प्राणी-पक्षांमध्ये मिसळत नसतो. मात्र व्हिडिओमध्ये हंस आणि माशांमध्ये अनोखी मैत्री पहायला मिळत आहे.
हंस पक्षी पाण्यामध्ये विहरतोय त्याचवेळी त्याने पाण्याच्या बाहेर असलेले दाणे टिपून ते पाण्यातील माशांना खाऊ घालण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. पाण्यातील ही पारदर्शक मैत्री सर्वांचीच मने जिंकत आहे. मासे हंसाशी इतकी जवळीक साधतात की त्यांनी हंस पक्षाच्या चोचीलाच विळखा घातला आहे.
पाण्यातील हे दृश्य पाहताना प्रचंड आनंद मिळत आहे. त्यामुळे सोशल मीडियात या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर लाईक आणि तितक्याच प्रमाणात कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘मैत्री असावी तर अशी’… अशा प्रकारची उत्स्फूर्त प्रतिक्रिया अनेकांनी नोंदवली आहे.
अनेक जण उत्कृष्ट मैत्रीचा दाखला देण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना शेअर करीत आहेत. व्हिडिओतील कंटेंट लक्षात घेता हा व्हिडिओ तुमचं देखील मन जिंकेल, यात शंका नाही.