Starbucks ने नोकरीवरुन काढले पट्ट्याने घेतला असा भन्नाट बदला, वाचाल तर हैराण व्हाल

| Updated on: Oct 16, 2023 | 12:39 PM

आपण एखाद्या कंपनीतून दुसरीकडे कामाला लागताना आधीच्या कंपनीबद्दल राग असला तरी फारसा व्यक्त करीत नाही. परंतू स्टारबक्सच्या कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढल्याने त्याने असा बदला घेतला की वाचून तुम्हीही चाट पडाल..

Starbucks ने नोकरीवरुन काढले पट्ट्याने घेतला असा भन्नाट बदला, वाचाल तर हैराण व्हाल
Starbucks-Coffee
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 16 ऑक्टोबर 2023 : एखाद्याला जर नोकरीवरुन काढून टाकले तर तो काय करु शकतो याचे खतरनाक उदाहरण एका जगप्रसिद्ध कॉफी हाऊसबद्दल घडलं आहे. जगभरातील प्रसिद्ध कॉफी हाऊस चेन स्टारबक्सच्या ( Starbucks ) एका माजी कर्मचाऱ्याने इंटरनेटवर अक्षरश: थैमान घातले आहे. त्याने कंपनीच्या सर्वात पसंत केल्या जाणाऱ्या ड्रींक्सची रेसिपीच ऑनलाईन शेअर करुन टाकली आहे. त्याला नोकरीवरुन काढताच त्याने हा अनोखा बदला घेतला आहे. त्याची ही पोस्ट शेअर झाल्यानंतर तुफान व्हायरल झाली आहे. लोक या पोस्टवर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

ट्वीटरवर ( एक्स ) कल्याणनावाच्या युजरने लिहीले आहे की, ‘स्टारबक्सच्या एका कर्मचाऱ्याला बडतर्फ केले आहे. आणि त्याने स्टारबक्सच्या सर्व ड्रींकची रेसिपी पोस्ट केली आहे. आपले स्वागत आहे.’ युजरने माजी कर्मचाऱ्याद्वारा शेअर केलेल्या फोटोंना एक्सवर पोस्ट केले आहे. या फोटोत व्हाईट चॉकलेट मोचा, कोकोनट मिल्क, वेनिला लाटे, आईस्ड कॅरेमल, कोल्ड ब्रु विद कोल्ड फोआमचा समावेश आहे. या पोस्टला 14 ऑक्टोबरला शेअर केले होते. त्यानंतर या पोस्टला 9.53 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. 21 हजार लोकांनी त्यास लाईक केले आहे. 5 हजाराहून अधिक लोकांनी रिट्वीट केले आहे. तर मोठ्या प्रमाणात या पोस्टला प्रतिक्रीया आल्या आहेत.

अशा भन्नाट प्रतिक्रीया आल्या

एका युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहीले आहे की, आता आपण उत्तम ड्रींक्स बनवू शकतो आणि त्याचे नामकरणही करू शकतो. आणि त्यास Arine Grande वा काहीही बोलू शकतो. अन्य एका युजरने लिहीले की, मी ही पोस्ट सेव्ह केली आहे. परंतू तरीही माझ्या फेव्हरेट कॉफीसाठी मी स्टारबक्स जाईनच. तिसऱ्या युजरने लिहीलेय की जेव्हा तुम्ही यास घरी बनवाल, तेव्हा त्यास स्टारबक्सवाली टेस्ट आणि वाइब येणार नाही. चौथे एका युजरने म्हटलंय, ‘थोडीसी कॉफी, खूप सारी साखर आणि गोड चॉकलेट, सिरप, स्प्रिंकल्स आणि फोम बरोबर पंप केलेले दूध, जोवर तुम्हाला सारखेची सवय नसेल, जादावेळ तर पिण्याच्या लायकीचे नसते.’ तर काही युजरने या कर्मचाऱ्यावर तर केस टाकायला हवी अशी प्रतिक्रीया देखील दिली आहे.