मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) ‘कच्चा बदाम‘ (Kacha Badam) या बंगाली गाण्याची मोठ्या प्रमाणावर क्रेझ पाहायला मिळतेय. सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत आता परदेशातही लोक रील्स बनवून हे गाणे शेअर करत आहेत. हे गाणे कोणत्याही प्रसिद्ध गायकाने गायले नाही, तर भुबन बड्याकर नावाच्या व्यक्तीने गायले आहे, जो आपल्या दुचाकीवरून छोट्या-मोठ्या वस्तू विकतो. भुबन मूळचा पश्चिम बंगालमधील बीरभूमचा आहे. हे गाणे व्हायरल झाल्यानंतर भुबन रातोरात लोकप्रिय झाला आहे. आता सोशल मीडियावर (Soccial Media) एका वेगळ्या व्हीडिओने धुमाकूळ घालतोय. हा व्हीडिओ पंजाबमधला (Punjab) आहे. एक लिंबूपाणी विक्रेत्याचा हा व्हीडिओ आहे. त्याचा हा हटके अंदाजात लिंबूपाणी विकण्याच व्हीडिओ सध्या वाऱ्यासारखा व्हायरल होतोय. ‘बाकी नींबू बाद विच पाऊंगा!’ (Baki Nimbu Bad Vich Paunga) , असे या गाण्याचे बोल आहेत.
गौरव सागर या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओला 15 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिलंय. तर साडे नऊ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. हा व्हीडिओ सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरताना पाहायला मिळतोय. त्याची सोडा ग्लासमध्ये ओतण्याची आणि लिंबूपाणी बनवण्याची पद्धत अनेकांना भावतेय. तीन वर्षांपूर्वीही या व्यक्तीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्याचा हा बाकी नींबू बाद विच पाऊंगा! व्हीडिओही नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतोय. हा व्हीडिओ पंजाबमधील रूपनगरमधील असल्याचं बोललं जातंय.
काही दिवसांआधी असाच एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. यात एक काका ‘काला अंगूर’ गाताना पाहायला मिळाले. त्याआधी त्याचं ‘कच्चा अमरूद’ हे गाणंही व्हायरल झालं होतं. काका रस्त्यावर फिरतात आणि गाणी गाताना फळे विकतात. नुकतेच जेव्हा त्यांचे ‘कच्चा अमरूद’ हे गाणे व्हायरल झाले तेव्हा एक वेगळाच उत्साह दिसून आला होता. आता तेच गाडीवर बसून ‘काला अंगूर’ विकताना आणि त्यावर गाणी म्हणताना दिसले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी त्याला चांगलीच पसंती दिली.
संबंधित बातम्या