मुंबई : क्रिकेट (Cricket) हे फक्त पुरुष खेळायचे असा एक काळ होता. पण सध्याचा क्रिकेटचा काळ पुर्णपणे बदलला आहे. जगात महिला क्रिकेट खेळताना दिसत आहेत. सोशल मीडियावर (Social Media) एका छोट्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये छोटी मुलगी एकदम भन्नाट क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे तिचा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. त्याचबरोबर लोकांनी कमेंट करुन दिल्या शुभेच्छा सुध्दा दिल्या आहेत. त्या मुलीने व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये महेंद्रसिंग धोनीसारखे (MS Dhoni) सारखे फटके मारले आहेत. त्यामुळे ती अधिक चर्चेत आली आहे.
त्या वायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ती मुलगी किती भारी क्रिकेट खेळत आहे, हे स्पष्ट दिसत आहे. त्याचबरोबर प्रचंड फास्ट क्रिकेट खेळत आहे. कधी उजव्या तर कधी डाव्या बाजूला ती फटकेबाजी करीत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना विश्वास बसत नाही आहे की, इतकी लहान मुलगी इतकी फास्ट क्रिकेट खेळत आहे.
My fav is the ‘helicopter shot’☄️
What’s your pick? pic.twitter.com/q33ctr0gnH— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) March 23, 2023
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर ट्विटरवरती @ikpsgill1 या नावाच्या अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काही लोकांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एक नेटकऱ्याने कमेंट करताना म्हटलं आहे की, मुलीचा आत्मविश्वास पाहून अधिक खूश झालो आहे. त्याचबरोबर आणखी एका युझरने कमेंट करताना म्हटलं आहे की, हा व्हिडीओ खूप सुंदर आहे. आतापर्यंत 36 हज़ार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी ट्विट केले. ते म्हणाला- माझा आवडता हेलिकॉप्टर शॉट आहे, तुझा कोणता आहे?
लहान मुलांचे आतापर्यंत सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर ते लोकांच्या पसंतीला सुध्दा पडले आहेत. लोकांनी त्या व्हिडीओला लाईक करुन कमेंट देखील केल्या आहे. यंदाचं आयपीएल सुरु झाल्यानंतर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.