Video | “काहीही झालं तरी लस घेणार नाही”, आजीबाई चांगल्याच भडकल्या, मजेदार व्हिडीओ पाहाच

| Updated on: May 29, 2021 | 6:22 PM

सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून यामध्ये एक आजीबाई लस घेण्यास नकार देत आहे. (aged women corona vaccine video)

Video | काहीही झालं तरी लस घेणार नाही, आजीबाई चांगल्याच भडकल्या, मजेदार व्हिडीओ पाहाच
OLD WOMEN VIRAL VIDEO ON VACCINATION
Follow us on

मुंबई : कोरोनाला थोपवायचे असल्यास लसीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबवणे हा नामी उपाय असल्याचे सांगितले जातेय. त्यानुसार सध्या देशभरात युद्धपातळीवर लोकांना लस दिली जातेय. मात्र, सोशल मीडियावर पसरणारी खोटी माहिती तसेच अफवा यामुळे अनेकजण लस घेण्यास नकार देत आहेत. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून यामध्ये एक आजीबाई लस घेण्यास सांगितल्यावर चांगलीच भडकली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण विविध प्रतिक्रिया देत आहेत. (aged women denied to vaccinate herself think that she will die after taking Corona vaccine jab video goes viral)

आजीबाईंचा लस घेण्यास नकार

सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका आजीबाईला कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी विनवण्यात येत आहे. मात्र, आजीबाई काही ऐकायला तयार नसल्याचे दिसतेय. कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला तर मृत्यू होण्याची भीती या आजीला आहे. याच कारणामुळे काहीजरी झाले तरी मी लस घेणार नाही, असे ही आजीबाई म्हणत आहे.

नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी कोरोना लसीबद्दल चुकीची माहिती पसरवलेली आहे. त्याचाच हा परिणाम असल्याचे म्हटले आहे. तर काहींना कोरोना लसीवरून केलेल्या राजकारणामुळे हे घडत असल्याचा आरोप केलाय. काही नेटकऱ्यांनी आजीबाईच्या या व्हिडीओला मजेदार व्हिडीओ म्हणत आनंदाने शेअर केले आहे.

पाहा व्हिडीओ :

अफवांवर विश्वास ठेवू नका 

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकजण त्याला शेअर करत आहेत. असे असले तरी कोरोना प्रतिबंधक लसीबाबत रोज भ्रामक माहिती सोशल मीडियावरुन पसरवली जाते. त्यावर विश्वास न ठेवण्याचे आरोग्य विभाग तसेच सरकारकडून सांगितले जात आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. दुसऱ्या लाटेत रोज चार लाखांच्या पुढे कोरोनाग्रस्त आढळत होते. मात्र, आता ही संख्या दोन लाखांच्या खाली आली आहे.

(वरील प्रकारच्या कोणत्याही व्हिडीओचे आम्ही समर्थन करत नाही.)

इतर बातम्या :

VIDEO | ट्रकचा ब्रेक फेल झाला म्हणून चालकाने 3 किमी केले रिव्हर्स ड्रायव्हिंग; व्हिडीओ तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

VIDEO | हत्तीला पाहून वाघाने ठोकली धूम; लोक म्हणाले, कळले ना जंगलचा राजा कोण!

‘बाहुबली’तलं ‘माहिष्मती’ काल्पनिक नाही! वाचा कुठे वसलंय ‘हे’ अनोख राज्य आणि त्याची सध्याची स्थिती

(aged women denied to vaccinate herself think that she will die after taking Corona vaccine jab video goes viral)