दिवाळीचा माहोल संपूर्ण देशभर पाहायला मिळत आहे. लोक कोरोना महामारीनंतर मोठ्या उत्साहाने या सणाचे सेलिब्रेशन करीत आहेत. अगदी लहान मुलांपासून ते तरुणाईपर्यंत सगळेच फटाके फोडण्यामध्ये प्रचंड मशगुल झाले आहेत. या उत्साहाला व्हिडिओमध्ये कैद करण्याचा मोह अनेकांना आवरेनासा झाला आहे. बरेच तरुण-तरुणी सध्या सोशल मीडियामध्ये व्हिडिओ पोस्ट करण्यात आघाडीवर आहेत. हे लोक सार्वजनिक ठिकाणीही व्हिडिओ बनवतात. अशाच प्रकारे धावत्या कारवर जल्लोष करीत फटाके फोडणारे युवक अहमदाबाद पोलिसांच्या तडाख्यात सापडले. पोलिसांनी त्यांना दिलेली अजब शिक्षा सध्या सोशल मीडियामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. या शिक्षेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
अनेक तरुण-तरुणी वेगवेगळे स्टंट्स करतात. त्यांच्या थरारक कसरतीला सोशल मीडियामध्ये दाद दिली जाते. त्यामुळे त्यांचा उत्साह आणखी द्विगुणीत होतो. मात्र याच उत्साहात अनेक जण स्वतःच्या जीवाशी खेळ करीत व्हिडिओ बनवतात.
सध्याच्या दिवाळीच्या दिवसांत अहमदाबादमध्ये तेथील तरुणांनी अशाच प्रकारे अतिरेक करीत व्हिडिओ बनवला. धावत्या कारवर जल्लोष फटाके फोडले. त्यांचा हा जल्लोष पोलिसांच्या नजरेत भरला आणि पोलिसांनी त्यांना कायद्याचा दंडुका दाखवला.
#AhmedabadPolice pic.twitter.com/ddwZCFd9Gf
— Ahmedabad Police ?♀️અમદાવાદ પોલીસ (@AhmedabadPolice) October 27, 2022
सगळे नियम कायदे धाब्यावर बसवत दिवाळीचा जल्लोष करणारी तरुणाई अहमदाबाद पोलिसांच्या कारवाईच्या कचाट्यात सापडली आहे. भले पोलिसांनी उत्साही तरुणाईवर गुन्हे दाखल केले नसतील, पण त्यांना जी काही शिक्षा दिली ती पाहून तरुणाई ताळ्यावर आली असेल.
पोलिसांनी सर्वांनाच रांगेत उभे केले आणि उपस्थित लोकांसमोर उठाबशा काढायला भाग पाडले. पोलिसांची ही अजब शिक्षा पाहून व्हिडिओ बनवण्यासाठी उत्सुक असलेले अन्य तरुण-तरुणीही ‘लाईनीवर’ आले नसतील तर नवल.
भर रस्त्यात ट्राफिक अडवत कारवर फटाके फोडण्याचा धिंगाणा यापुढे करायचा नाही बुवा, अशीच खूनगाठ अनेक तरुण-तरुणींनी मनाशी बांधली आहे. सोशल मीडियातील हौशी तरुणाईला ताळ्यावर आणण्याचा अहमदाबाद पोलिसांचा फंडा सोशल मीडियात प्रचंड गाजला आहे.
सोशल मीडियामध्ये व्हिडिओ पोस्ट करण्याचा सपाटा बरेच तरुण-तरुणी लावतात. दिवाळीच्या दिवसांत फटाक्यांवर कंट्रोल येणं गरजेचे आहे. त्यातही फटाके फोडताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र याकडे बरीच लहान मुले आणि तरुण-तरुणीही दुर्लक्ष करतात.
याबाबत पुरेसे प्रबोधन करण्याची आवश्यकता बोलून दाखवली जात आहे. त्याच अनुषंगाने अहमदाबाद पोलिसांनी हाती घेतलेली अजब शिक्षेची मोहीम सोशल मीडियामध्ये कौतुकाचा विषय बनली आहे.
या विधायक हेतूने अहमदाबाद पोलिसांनी स्वतःच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून तरुणाईला दिलेला शिक्षेचा व्हिडिओ शेअर केला आहे. काहींनी अहमदाबाद पोलिसांच्या शिक्षेवर टीकाही केली आहे.
मात्र शिक्षेचे कौतुक करणाऱ्या मंडळींचे प्रमाण तुलनेत अधिक आहे. तशा कॉमेंट्सचा वर्षाव झाला आहे. सजग पालक मंडळी अहमदाबाद पोलिसांचा व्हिडिओ तितक्याच प्रमाणात शेअर करीत आहे.