उडत्या विमानात, ती, दारु आणि चखणा, पायलटकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ

| Updated on: Apr 22, 2023 | 12:26 PM

दुबई ते दिल्ली या विमान प्रवासादरम्यान एअर इंडियाच्या पायलटने आपल्या महिला मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बसवून प्रवास घडवून आणल्याची घटना समोर आली आहे. एवढंच नव्हे त्यादरम्यान तिला बिझनेस क्लास ट्रीटमेंट मिळत राहिली. केबिन क्रूने या प्रकरणाची तक्रार डीजीसीएकडे केली.

उडत्या विमानात, ती, दारु आणि चखणा, पायलटकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : ये दोस्ती हम नही तोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथना छोडेंगे…. हे गाणं ऐकायला कितीही मस्त वाटत असलं तरी दोस्तीसाठी किंवा मित्रांसाठी आपला जीव देणारे किंवा धोक्यात घालणारे फारच दुर्मिळ असतात. पण एअर इंडियाच्या (Air India) एका पायलटने (pilot) तर त्याच्या दोस्तीसाठी एक अतरंगी काम केले आहे. फ्लाइटच्या प्रवासादरम्यान त्या पायलटने मैत्रिणीला कॉकपिटमधून (cockpit) प्रवास करू दिला . एवढंच नव्हे तर तिला बिझनेस क्लास ट्रीटमेंट मिळत राहिली. मात्र या सगळ्यात प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला.

विमान प्रवास ही आता मोठी गोष्ट नाही. आता प्रत्येकाला कधी इकॉनॉमी क्लासमध्ये तर कधी बिझनेस क्लासमध्ये बसण्याचा अनुभव घ्यायचा आहे. पण एखाद्याला कॉकपिटमध्ये बसण्याची संधी मिळाली तर? पण इथेच थांबा सर, कॉकपिट हे सर्वसामान्यांसाठी अजिबात नाही. पायलट आणि क्रू मेंबर्स व्यतिरिक्त, इथे इतर कोणाच्याही प्रवेशावर बंदी आहे. जर एअरलाइन्सच्या कर्मचार्‍यांव्यतिरिक्त इतर कोणीही प्रवेश केला तर मोठी कारवाई होऊ शकते. हे नियम चांगले माहीत असूनही, एका वैमानिकाने हे सर्व नियम एका महिला मैत्रिणीसाठी मोडीत काढले आणि आता त्याची यासंदर्भात चौकशी होणार आहे.

काय आहे ही घटना ?

दुबई ते दिल्ली या विमान प्रवासादरम्यान एअर इंडियाच्या पायलटने आपल्या महिला मैत्रिणीला स्पेशल ट्रीटमेंट देण्यासाठी तिला कॉकपिटमध्ये बसवून प्रवास करायला दिला. एवढंच नव्हे तर यादरम्यान तिला बिझनेस क्लास ट्रीटमेंट मिळत राहिली. केबिन क्रूने याबाबत डीजीसीएकडे तक्रार केली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. त्याचवेळी एअर इंडियाही त्यांच्या वतीने तपास करत आहे.

 

महिला मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बसवणे पडले महागात

या घटनेचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. त्यावरून असे कळते की, एका पायलटने आपल्या महिला मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बसवून प्रवास करायला लावलाच, पण तिला तिथे अल्कोहोल आणि स्नॅक्सही ऑफर केले. पायलटच्या या मैत्रिणीने इकॉनॉमी क्लासचे तिकीट काढले होते. पण त्या पायलटला तिला बिझनेस क्लासचा आनंद द्यायचा होता. त्यासाठी तो केबिन क्रूशीही बोलला. मात्र, त्यावेळी बिझनेस क्लास फुल असल्याने त्या पायलटने जुगाड करून त्या मैत्रिणीला कॉकपिटमध्येच बसवले. मात्र हे नियमांचे पूर्ण उल्लंघन होते.

आरोपी पायलटवर चौकशीची तलवार

दुबईहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात पायलटने बेजबाबदार कृत्य केले. ज्याची तक्रार केबिन क्रूने DGCA कडे केली होती. आता आरोपी पायलटच्या विरोधात तपास सुरू करण्यात आला असून तपास पूर्ण होईपर्यंत विमान कंपनीने वैमानिकाला उड्डाण करण्यासही बंदी घातली आहे. ही बाब 27 फेब्रुवारीची आहे. ज्यासंदर्भात 21 एप्रिलला पहिल्यांदा पायलटला समन्स पाठवण्यात आले होते.

‘रिपोर्ट करण्यात आलेली ही घटना आम्ही गांभीर्याने घेतली असून या संदर्भात एअर इंडियात चौकशी सुरू आहे. आम्ही या प्रकरणाची DGCA ला देखील तक्रार केली आहे आणि त्यांच्या तपासात सहकार्य करत आहोत. आमच्या प्रवाशांच्या सुरक्षिततेशी आणि कल्याणाशी संबंधित बाबींमध्ये आम्ही शून्य सहनशीलता बाळगतो आणि याप्रकरणी आवश्यक ती कारवाई करू.’असे एअर इंडियांने स्पष्ट केले आहे.

यापूर्वी अनेकांनी विमान प्रवासादरम्यान गैरवर्तन केले. त्यात सामान्य नागरिकांपासून ते खासदारांबद्दल अनेकांचा समावेश आहे. त्यांच्यावर कारवाई झाली आहे, प्रवाशांच्या यादीत सर्वच विमान कंपन्या अशा व्यक्तीच्या नावावर बंदी घालतात. मग कॉकपिटमध्ये मैत्रिणीला बसू देणाऱ्या पालटवर आता काय कारवाई होते या कडे सर्वांचे लक्ष आहे.