कलाकारांकडे अदभुत शक्ती असते. याच अद्भुत शक्तीच्या जोरावर अशक्य गोष्टही साध्य करण्याची क्षमता कलाकाराकडे असते. अनेक कलाकारांचे कौशल्य सर्वांना चकित करणारे असते. सोशल मीडियामध्ये नुकताच शेअर करण्यात आलेला एक कलेचा व्हिडिओ असाच सर्वांना थक्क करत आहे. चक्क काचेवर कलाकृती करण्यात आली आहे. ही कलाकृती ज्या पद्धतीने साकारण्यात आली आहे, त्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. काचेवर हातोड्याचे घाव घालत कलाकृती साकारली गेली आहे.
कलाकाराच्या कलाकृतीची फारच कमाल आहे. या कलाकारांनी चक्क काचेवर हातोड्याने घाव घालत तुकडे तुकडे केले आणि एक अद्भुत चेहरा साकारला. या जबरदस्त आर्ट वर्कचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.
लोक या व्हिडिओला भरभरून दाद देत आहेत. कलाकृती पाहून प्रत्येक जण मंत्रमुग्ध होत आहे. अनेक जण या कलाकृतीच्या व्हिडिओवर अविस्मरणीय अशा कमेंट्स नोंदवत आहे.
कलाकार एक मोठी काच घेतो आणि त्यावर हातोडा आणि इतर अवजारांचा घाव घालतो. अशा पद्धतीने अवघ्या काही क्षणांतच काचेवर एखादा सुंदर असा चेहरा साकारला जातो ते पाहून प्रत्येक जण तोंडात बोट घालत आहे.
काहीजण या कलाकृतीला दैवी देणगी असल्याचे मानत आहेत, तर काही मुक्तहस्ते स्तुती सुमनांची उधळण करत आहेत. इंस्टाग्रामवर या व्हिडिओला तब्बल पावणेसहा लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.
यावरून काचेत साकारलेली कलाकृती किती जबरदस्त आहे याचा अंदाज कलाप्रेमी बांधत आहेत. संपूर्ण विश्वास फार कमी लोकांच्या वाट्याला अशी कलेची देणगी लाभलेली असते, असेही मत काहींनी नोंदवले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या तोंडूनही अशीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया बाहेर पडू शकते.
महिलेचे आर्ट वर्क बनवण्यासाठी किती महिन्यांचा सराव करण्यात आला. त्या तपश्चर्येतूनच यशस्वी कलाकृती साकारली गेली आहे. त्यामुळे कलाकाराच्या चिकाटीलाही सलाम दिला जात आहे.