स्केटिंग (Skating) हा काही लहान मुलांचा खेळ नाही. यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. मात्र आजकाल लहान मुलंही अप्रतिम स्केटिंग करताना दिसतात. ते पाहून त्यांचं कौतुक केल्याशिवाय आपल्याला राहावत नाही. जगभरात स्केटिंग स्पर्धाही आयोजित केल्या जातात, त्या पाहण्यात आपल्याला खूप मजा येते. विशेषत: लहान मुलांना स्केटिंग करताना पाहणं खूप रोमांचक असते. ते स्केटिंग करताना पाहून आपल्या मनात विचार येतो, की एवढी लहान मुलं कसं परफेक्शन देत असतील? मुलांचं बाजुला ठेवू, पण तुम्ही कधी कुत्र्याला स्केटिंग करताना पाहिलं आहे का? होय, आजकाल असाच एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होतोय, ज्यामध्ये एक कुत्रा उत्साहात स्केटिंग करताना दिसत आहे.
सहज करतो स्केटिंग
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की कुत्रा प्रथम इकडे तिकडे पाहतो आणि नंतर हळू हळू स्केटबोर्डवर चढतो आणि न पडता पायऱ्यांवरून खाली येतो. स्केटिंग करताना तो खूप पुढे जातो. उतार असल्यानं त्याला पुढे जाण्यास अडचण येत नाही. जरी लोकांना सहसा स्केटबोर्ड पुढे नेण्यासाठी अनेक वेळा जमिनीवर आदळावं लागतं, परंतु कुत्र्याला ही समस्या नव्हती. तो मजेत स्केटबोर्डवर आरामात चढतो आणि पुढे जातो.
ट्विटरवर शेअर
कुत्र्याला तो स्केटबोर्ड इतका आवडला, की तो वरच्या बाजूला उतरायचं नावही घेत नव्हता. हा एक अतिशय मजेशीर व्हिडिओ आहे, जो आयएएस अधिकारी डॉ. एमव्ही राव यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘ये रहे मेरे स्केटिंग गुरू’.
Here is my Skating Guru ?@pareekhjain pic.twitter.com/yRWDLoFa11
— Dr. M V Rao, IAS (@mvraoforindia) January 11, 2022
अनेकांनी केला लाइक
हा मजेदार व्हिडिओ आतापर्यंत 1 हजार वेळा पाहिला गेला आहे, तर अनेकांनी व्हिडिओला लाइकदेखील केलंय. अनेकांनी कमेंट्स आणि व्हिडिओचं कौतुकही केलंय. सोशल मीडिया यूझर्सनी या व्हिडिओला वर्णन अतिशय सुंदर असल्याचं म्हटलंय. कुत्र्यांशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असले, तरी हा व्हिडिओ पूर्णपणे वेगळा आणि खूप मजेदार आहे. तुम्हाला तो पुन्हा पुन्हा पाहावा वाटेल.