नवी दिल्ली : आजच्या विज्ञानाच्या युगातही अनेक जण भूतांवर विश्वास ठेवत असतात. झपाटलेल्या स्थळांचा आणि अतृप्त आत्म्यांचा माग घेणारे पॅरानॉर्मल एक्टीविटी शोधणारे अनेक जण आपल्याला ठावूक असतील. त्यांच्या डिस्कव्हरी चॅनलवर अशा लोकांचे दावे आणि कहाण्या आपण पाहिल्या देखील असतील. परंतू आता भूतांना शोधणाऱ्या एका यंत्राचीच amazon एमेझॉन वर सर्रास विक्री सुरू आहे. या हे यंत्र भूतांना पकडण्याचा दावा करत असून अनेक जण या डीव्हाईसला खरेदी करीत आहेत. हे डीव्हाईस कसे काम करते ते पाहूया…
यासाठी बनविला आहे घोस्ट डीटेक्टर डीव्हाईस
बाजारात ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर सर्रास विक्री होणारे ‘घोस्ट डीटेक्टर डीव्हाईस’ हे यंत्र प्रत्यक्षात एक EMF डीटेक्टर म्हणजेच ( इलेक्ट्रो मॅग्नेटीक फिल्ड डिटेक्टर ) आहे. या डीव्हाईसच्या मदतीने जेथे इलेक्ट्रोमॅग्नेटीक लहरी जादा असतात. त्या जागेचा शोध घेता येतो. ही मशिन काही मिनिटांत आपले काम चोख करते. आणि कुठे विद्युत चुंबकीय लहरी जादा आहेत त्याच्या एका धांडोळा घेते. सायन्सच्या क्षेत्रात अनेक शास्रज्ञ अशा मशिन्स त्यांच्या संशोधनासाठी वापरत असतात. परंतू आता या मशिनचा वापर ‘पॅरानॉर्मल एक्टीविटी’ म्हणजेच आत्मा, भूतखेतांचा वावर शोधणारे लोक हेच यंत्र आता कामासाठी वापरीत आहेत.
‘घोस्ट डिटेक्टर’ नावाने ऑनलाईन विक्री
काही लोक असे मानतात की जेथे भूतांचा वावर असतो तेथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड तयार झालेले असते. त्यामुळे हे मशिन जर आपल्याकडे असेल तर झपाटलेल्या जागांवर ते घेऊन तेथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड आहे का ते शोधता येते. त्यामुळे तेथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड जास्त त्या जागांवर भूतांचे अस्तित्व असते असे मानले जाते. अर्थात या गोष्टींवर सर्वांचा विश्वास असेलच असे नाही. पॅरानॉर्मल एक्सपर्ट या डीव्हाईसच्या मदतीने भूतांचा शोध घेत असतात. त्यामुळे या मशिनची ‘घोस्ट डिटेक्टर’ नावाने ऑनलाईन विक्री होत आहे. अर्थात या यंत्राला केवळ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड शोधण्यासाठीच तयार केले आहे. एमेझॉनवर या यंत्राला दोन ते पाच हजार रूपयांत धडाक्यात विक्री होत आहे.