मुंबई : सोशल मीडियावर (Social media) प्राण्यांचे अनेक व्हायरल व्हिडीओ (animal viral video) पाहायला मिळतात. त्यामध्ये काही चांगले असतात, तर काही हल्ले केलेले असतात. लोकांना प्राण्यांचे दोन्ही व्हिडीओ पाहायला आवडतात असं अनेकदा सोशल मीडियावर दिसून आलंय. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये संतप्त हत्तीने रस्त्याच्या मधोमध (Angry Elephant On Road) जाणाऱ्या पिकअप गाडीला उचलून फेकल्याचं स्पष्ट आहे. हत्तीचा रुद्रावतार पाहून लोकांनी बघ्याची भूमिका घेतली असल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.
संतापलेला एक हत्ती रस्त्याच्या मधोमध चालत होता. त्यावेळी रस्त्यावर पिकअप गाडी उभी असलेली दिसत आहे. भरलेला पिकअप टेम्पो रागाच्या भरात हत्ती एक दमात उलटवून टाकत आहे. ज्यावेळी हत्ती त्या टेम्पोला धडका घालत आहे. त्यावेळी गाडीत एक व्यक्ती दिसत आहे. हत्ती रस्त्यातील गाडी धक्के मारुन एका बाजूला ढकलत आहे. रस्त्यावर अनेक लोक ही घटना पाहत आहेत.
तुमने मेरे इलाके में #घर क्यों बनाया ????#Narengi #Guwahati today.??@susantananda3 @ParveenKaswan @ipsvijrk @SudhaRamenIFS @moefcc pic.twitter.com/puaHBG5mQM
— Rupin Sharma IPS (@rupin1992) January 14, 2023
हा व्हिडीओ आईपीएस रूपिन शर्मा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी हात जोडले असल्याचे कमेंटच्या माध्यमातून सांगितले आहे. आईपीएस रूपिन शर्मा यांनी या व्हिडिओच्या वरती “तुम्ही माझ्या इलाख्यात घर का बनवत आहात” असं कॅप्शन लिहिलं आहे. या व्हिडिओला आतापर्यंत एक लाख लोकांनी पाहिले आहे. 76 हजार लोकांनी लाईक केले आहे.
सोशल मीडियावर विविध पद्धतीच्या कमेंट येत आहेत.