मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होण्यासाठी लोकं काय करतील याचा नेम नाही. काही लोकं अधिक फेमस होण्यासाठी आपल्या जीवाची सुध्दा परवा करीत नाहीत असं अनेकदा पाहायला मिळालं आहे. परंतु अशा पद्धतीने व्हिडीओ (video viral) तयार करणाऱ्या लोकांची क्रेज अधिक वाढली आहे. काही तरुणांना असं वाटतं की स्टंट (stunt video in marathi) केल्यावर व्हिडीओ अधिक व्हायरल होतात. त्यामुळे अनेक तरुण स्टंट करीत असतात. सध्या एक तसाचं व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका व्यक्तीने एक वेगळ्या पद्धतीचा स्टंट केला आहे.
सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ती व्यक्ती दिसत आहेत. त्यापैकी एक व्यक्ती स्टंट करीत आहे. त्या व्यक्तीने मजेशीर पद्धतीने स्टंट केला आहे. हवेत उडी मारून त्या व्यक्तीने पॅन्ट घातली आहे. तुम्ही तो व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला तो व्हिडीओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला नक्की कळवा, हा स्टंट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळीचं एनर्जी दिसणार आहे.
व्हिडीओमध्ये तो व्यक्ती कशा पद्धतीने हवेत उडी घेत आहे. हे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ज्यावेळी त्या व्यक्तीने हवेत उडी घेतली आहे, त्यावेळी त्या व्यक्तीने आपली कलाबाजी सुध्दा दाखवली आहे. ज्या दोन लोकांची पॅन्ट पकडली, त्या पॅन्टमध्ये स्टंट करणारी व्यक्ती उडी घेत आहे. ज्यावेळी त्या व्यक्तीची उडी बरोबर त्या पॅन्टमध्ये जाते, त्यावेळी त्या लोकांनी आनंद साजरा केल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या व्यक्तीने हा स्टंट केला आहे. ती व्यक्ती जमिनीला घासून डान्स करीत आहे.
सध्याचा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवरती काजेम घासेमी (Kazem Ghasemi) नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. त्या व्यक्तीने त्या व्हिडीओसाठी एक वाक्य लिहीलं आहे. त्याचा अर्थ २०२३ मध्ये पॅन्ट घालण्याची नवी पद्धत अस लिहीलं आहे. तुम्हाला या व्यक्तीचा स्टंट आवडला असेल तर नक्की कमेंट करा.