सोशल मीडियावर(Social Media) हत्ती आणि त्याच्या पिल्लाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हत्तीने रस्त्याने चालेला ऊसा ट्रक रोखला. अचानक हत्तीनी(Elephants) ट्रक रोखल्याने ट्रक चालकाने युक्ती लढवत हत्ती व त्याच्या पिल्लासाठी ऊसाच्या ट्रकमधील ऊसाच्या काही मोळ्या त्यांना खायला टाकल्या. त्यानंतर हत्तीनी ट्रकची अड्वलेली वाट मोकळी करून दिली आहे. भारतीय वन सेवेचे अधिकारी परवीन कासवान (IFS Parveen Kaswan) यांनीहा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 29 सेकंदाच्या या व्हिडीओ क्लिपला ट्विटरवर 1.2 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनीही या व्हिडिओ चांगलंच लाईक करत रिट्वीटही केले आहे. सोशल मीडिया युझरने लिहिले आहे की जगात आजही माणुसकी जिवंत आहे. तर दुसऱ्या एका युझरने लिहिले आहे की , ह जंगलातील रस्ता हा त्यांचे घर आहे कुणी त्यांच्या घरातून जाईल तर कर तर घेणारच ना? आणखी एका युझरने लिहिले आहेकी हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे.
What will you call this tax. pic.twitter.com/ypijxlSY5t
हे सुद्धा वाचा— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) July 24, 2022
भारतीय वन सेवेचे अधिकारी परवीन कासवान यांनी हाव्हिडिओ शेअर करताना त्याला What will you call this tax. असे कॅप्शन दिले आहे. यानंतर ट्विटरवर अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ शेअर करत सुपर टॅक्स , THIS IS CARE AND KINDNESS TAX. , रोड टॅक्स असे म्हणत त व्हिडीओ रिट्विट केला आहे . मात्र कासवान यांनी वन्य प्राण्यांना अश्या प्रकारे खायला ना घालण्याचे आवाहन केले आहे. यामुळे त्यांना याप्रकारच्या खाद्याची सवय होते. साहजिकच त्यांचा मनुष्य वस्तीतील वावर वाढतो. यामुळे अनेकदा अपघाताच्या घटनाही घडतात. ते आपला परिघ सोडून रस्त्यावरही येतात. त्यामुळे त्यांचा जंगलातील अधिवास आहे तो जपला पाहिजे, त्यांना जंगलीच राहू द्या असे त्यांनी आपल्या पोस्टवर कमेंट करताना म्हटले आहे.