Anand Mahindra यांनी या महिलेचा व्हिडिओ का शेअर केला; तिच्याबद्दल नेमकं काय म्हणाले…

| Updated on: Apr 13, 2023 | 12:39 AM

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आदर्शचे ट्विट रिट्विट केले आहे. आणि त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, हे खरे हिरो आहेत. जे भारताला स्वच्छ करण्यासाठी आपापले काम शांतपणे करत आहेत.

Anand Mahindra यांनी या महिलेचा व्हिडिओ का शेअर केला;  तिच्याबद्दल नेमकं काय म्हणाले...
Follow us on

बेंगळूर : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. त्यातच एकादा व्हिडिओ चांगला असेल, त्यातून काही तरी शिकण्यासारखे असेल तर तो व्हिडिओ अनेकापर्यंत पोहचवण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. त्यातीलच एक नाव आहे. उद्योजक आनंद महिंद्रा. त्यामुळे आनंद महिंद्रा यांचे नवीन ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यावेळी व्यावसायिकाने फळे विकणाऱ्या महिलेची एक क्लिप शेअर केली आहे, जी पाहिल्यानंतर युजर्स महिलेचे खूप कौतुक करत आहेत.

महिला बसस्थानकातून कचरा उचलत आहे. जरी ते त्याचे काम नाही. वास्तविक, हा व्हिडिओ ट्विटर यूजर आदर्श हेगडे (@adarshahgd) ने 10 एप्रिल रोजी पोस्ट केला होता.

महिला बसस्थानकातून कचरा उचलत आहे. जरी ते त्याचे काम नाही. वास्तविक, हा व्हिडिओ ट्विटर यूजर आदर्श हेगडे (@adarshahgd) ने 10 एप्रिल रोजी पोस्ट केला होता. त्यावेळी त्याने त्यामध्ये कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ही महिला कर्नाटकातील अंकोला बसस्थानकावर फळे विकते.

ती पानांमध्ये गुंडाळलेली फळे ग्राहकांना देते. मात्र काही लोकं फळे खाल्ल्यानंतर बसच्या खिडकीतून पाने खाली फेकतात. ही महिला एक एक करून ती पाने उचलून डस्टबिनमध्ये टाकते आहे. हे तिचं काम नाही मात्र तरीही ते काम ती प्रामाणिकपणे करते आहे.

This lady is fruit seller & she sells fruits wrapped in leaves at Ankola Bus stand,Karnataka. Some people after finish eating they throw the leaves from bus window. But this lady goes there picks up the leaves and puts it in dustbin. Its not her work but she’s doing it. ??? pic.twitter.com/TaqQUGZuxP

— Adarsh Hegde (@adarshahgd) April 10, 2023

त्यामुळेच उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आदर्शचे ट्विट रिट्विट केले आहे. आणि त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, हे खरे हिरो आहेत. जे भारताला स्वच्छ करण्यासाठी आपापले काम शांतपणे करत आहेत. तर त्याही पुढे जाऊन त्यांनी लिहिले आहे की, त्यांना माझ्याकडून धन्यवाद कळवा आणि त्यांचे कौतूक मला करायचे आहे.

मात्र हे कसे करता येईल. त्याबाबत तुमच्या सूचना तुम्ही द्या. त्यानी आदर्शला टॅग केले आणि विचारले – तुम्ही त्या भागात राहणारे कोणीतरी शोधू शकता आणि त्याच्याशी संपर्क साधू शकता.

या व्हिडीओवर हजारो युजर्सनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामधीलच एकाने लिहिले आहे की, भारत महान आहे आणि त्या भारतातही महान लोक आहेत. त्यामुळे या महिलेने आपलं कर्तृत्व सिद्ध केले आहे.