Marathi News Trending Anand mahindra gave home to talilnadu idli amma m Kamalathal see the house photos
Photos : आनंद महिंद्रांनी गिफ्ट केलेलं इडली अम्माचं घर कसं आहे?, पाहा फोटो…
तामिळनाडूतील कोईंबतूर जिल्ह्यात राहणाऱ्या एम.कमलाथल यांनी केवळ एक रूपयात इडली विकतात.दिवसेंदिवस महागाई वाढत गेली पण त्यांनी आपल्या इडलीची किंमत वाढवली नाही. त्या त्याच दरात म्हणजे केवळ एक रूपयात लोकांना इडली खावू घालतात.
1 / 5
तामिळनाडूमध्ये लोकांना अवघ्या 1 रुपयात इडली खाऊ घालणाऱ्या इडली अम्माला स्वतःचं हक्काचं नवीन घर मिळालं आहे. आनंद महिंद्रा यांनी त्यांना एक वचन दिलं होतं. ते वचन त्यांनी मदर्स डेच्या निमित्ताने पूर्ण केलंय. त्यांचं हे घर कसं आहे याबाबत सध्या उत्सुकता आहे. त्याचे फोटो आता समोर आले आहेत.
2 / 5
इडली अम्मा या जरी स्वस्तात अनेकांची भूक भागवत असल्या तरी त्यांना मात्र हक्काचं घर नव्हतं. त्यांना आता हे हक्काचं घर मिळालं आहे. त्या याचा फोटो तु्म्ही पाहात आहात. घराला पांढरा रंग देण्यात आला आहे तर दार आणि खिडक्यांना चॉकलेटी रंग वापरण्यात आला आहे.
3 / 5
तामिळनाडूतील कोईंबतूर जिल्ह्यात राहणाऱ्या एम.कमलाथल यांनी केवळ एक रूपयात इडली विकतात.दिवसेंदिवस महागाई वाढत गेली पण त्यांनी आपल्या इडलीची किंमत वाढवली नाही. त्या त्याच दरात म्हणजे केवळ एक रूपयात लोकांना इडली खावू घालतात.
4 / 5
असं हक्काचं घर मिळाल्याने आपल्याला इडली अम्माही खूश आहे. एएनआयशी बोलताना त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, "मला आता नवीन घर मिळालं आहे. याचा मला खूप आनंद आहे आणि मी या महिन्याच्या अखेरीस नवीन घरात राहायला जाणार आहे."
5 / 5
त्यांच्या कामाची दखल घेत आनंद महिंद्रा यांनी त्यांना हे घर दिलं आहे. इडली अम्माला नवीन घर दिल्याची माहिती स्वतः आनंद महिंद्रा यांनी ट्विट करुन दिली आहे. त्यांनी मदर्स डे निमित्त त्यांनी हे गिफ्ट दिलं आहे. ज्याची सर्वत्र चर्चा आहे.