मुंबई: गरज ही शोधाची जननी असते. हे खरचं आहे असं म्हणत प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी सोशल मिडीयावर एक शेअर केला आहे. या व्हिडिओत पाण्यातून वाट काढण्यासाठी तरुणाने केलेला जुगाड(Jugaad) आनंद महिंद्रांना खूप आवडला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी या जुगाडू तरुणाचे कौतुक केले आहे. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल(Viral Video) झाला आहे.
आनंद महिंद्रा सोशल मिडीयावर चांगलेच अॅक्टीव्ह असतात. त्यांना कोणत्या वेगळ्या घटना, युनिक आयडिया वापरणारे लोक यांचे व्हिडिओ आढळले तर ते आपल्या ट्विटरवर हँडलवर शेअर करत असतात. जुगाडू लोकांचे चे विशेषत: कौतुक करत असतात. असाच एका जुगाडू तरुणाचा व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओत एक तरुण स्टूलच्या मदतीने पुराच्या पाण्यातून वाट काढताना दिसत आहे.
आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडिओ अत्यंत मजेशीर आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण स्टूलचा (Stool Use For Crossing Flooded Road) वापर करुन पाण्यातून वाट काढत जात असताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत गरज ही शोधाची जननी आहे, अशी कॅप्शन आनंद महिंद्रा दिले आहे.
?? As the saying goes: Necessity is the mother of invention… pic.twitter.com/VjyD2LzgAR
— anand mahindra (@anandmahindra) July 8, 2022
एक तरूण पूर्णपणे पाण्याखाली गेलेल्या रस्त्यातून वाट काढण्यासाठी दोन स्टुलांचा वापर करत. या स्टुलांच्या मदतीने तो एक एक पाऊल पुढे जात आहे. तो एका स्टुलावर पाय ठेवतो मग दुसरा स्टूल दोरीने उचलून पुढे ठेवतो. मग त्यावर पाय ठेवून दुसरा स्टुल उचलून त्यावर दुसरं पाऊल टाकत आहेत. डोकं लावून या तरुणाने पुराच्या पाण्यातून वाट काढल्याचे दिसत आहे.
या स्टुलच्या माध्यमातून तो पुरात न भिजता तो त्याच्या दुकानाजवळ पोहोचलेला दिसत आहे. एक स्टुलवर उभा राहून तो युवक दुसरं स्टुल पुढे ठेवतो. मग त्यावर उभा राहून पुढे जातो. या तरुणाचा हाच जुगाड आनंद महिंद्रा यांना खूप आवडला आहे. त्यामुळेच त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे.
आनंद महिंद्रा यांनी या जुगाडू तरुणाचे खूप कौतुक केलं आहे. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे किंवा हा युवक कोण आहे हे मात्र समजलं नाही. आनंद महिंद्रा यांनी ट्विट केल्यानंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असल्याचं दिसत आहे. भारतात जुगाडू लोकांची काहीच कमी नाही. आनंद महिंद्रा नेहमीच ट्विटरवर अशा वेगवेगळ्या जुगाडू लोकांचे व्हिडिओ शेअर करुन त्यांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन देत असतात.