मुंबई : आनंद महिंद्रा (Anand Mahindra Shares Amazing Video) सोशल मीडियावर किती सक्रीय असतात, हे सगळ्यांना माहित आहे. ते ट्विटरच्या (Twitter) माध्यमातून चांगल्या किंवा लोकांच्या आवडीच्या गोष्टी शेअर करीत असतात. सध्या त्यांनी त्यांच्या अकाऊंटवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. त्याची सगळीकडं चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर तो व्हिडीओ (viral video) सुध्दा लोकांना अधिक आवडला आहे. तो व्हिडीओ सोशल मीडियावर अनेक लोकांचं लक्ष खेचत आहे. त्यांनी जो व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यामध्ये खिडकी आणि गॅलरीचा जुगाड पाहायला मिळत आहे.
आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवरती व्हिडीओ शेअर केला आहे. तो सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्या व्यक्तीने इतकी भारी डिजाईन केली आहे की, सेकंदात सगळ काही बदलून जात आहे.व्हिडीओ पोस्ट करीत असताना त्यांनी लिहीलं आहे की, खरं सांगू का ? बांधकामाचा जो काही व्यवसाय आहे. त्यांच्याकडून क्वचित नवीन निर्मिती केली जाते. त्यामुळे तो खूप प्रभावशाली आणि बाह्य वातावरणाशी एकरूप झालेल्या नवीन जीवनशैलीशी सुसंगत आहे असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Frankly, the building industry rarely is a setting for innovation, so this is pretty impressive. And very much in line with new lifestyles that integrate with the outdoors. One more idea for you to consider when planning our buildings, @amitsinha73 pic.twitter.com/1xUBYid2R2
— anand mahindra (@anandmahindra) July 16, 2023
हा व्हिडीओ ९ लाख लोकांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे, त्याचबरोबर आठ हजार लोकांनी त्याला लाईक सुध्दा केले आहे. व्हिडीओला कमेंट करीत असताना एका व्यक्तीनं लिहीलं आहे की, पावसात चहा आणि भजी खायला ते ठिकाणं एकदम भारी आहे. त्याचबरोबर दुसऱ्या एका व्यक्तीनं लिहीलं आहे की, खूप चांगलं, पण त्यांनी हे घराच्या चार बाजूंना करायला हवं. आणखी एकानं लिहीलं आहे की, तर अशा पद्धतीचे पहिले मॉडेल नेदरलँड्समधील अॅमस्टरडॅममधील अपार्टमेंट इमारतीमध्ये तयार केले आहे.