Hindustan ki Antim Dukan : चमोली हा उत्तराखंड राज्यातील जिल्हा आहे. हा जिल्हा चीनच्या सीमेवर आहे. चीनच्या सीमेला लागून असलेल्या या जिल्ह्यात एक गाव आहे. ज्याचें नाव माणा आहे. या गावात भारतातील शेवटचे दुकान आहे. हा एक प्रसिद्ध सेल्फी पॉइंट आहे. या दुकानाला भेट देणारा पर्यटक त्याच्यासोबत सेल्फी घ्यायला विसरत नाही. असे मानले जाते, की या दुकानानंतर स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे. येथील लोक मानतात, की माणा गावाचा महाभारताशी विशेष संबंध आहे. या गावाचे जुने नाव मणिभद्रपुरम होते. या ठिकाणाहून पांडव थेट स्वर्गात गेले. या गावाच्या मुख्य रस्त्यावर एक फलकही लावण्यात आला आहे. माणा गाव हे भारताच्या सीमेवरील शेवटचे गाव असल्याचे या फलकावर लिहिले आहे. भारता(India)तील शेवटचे दुकान (India’s last shop) याच गावात आहे. आता याचसंबंधीचे ट्विट उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी केले आहे.
चहासह मॅगीही
25 वर्षांपूर्वी चंदर सिंह बारवाल नावाच्या व्यक्तीने हे दुकान उघडले होते. तेव्हापासून हे दुकान देशभर प्रसिद्ध झाले आहे. उत्तराखंडमध्ये फिरायला येणारे लोक सर्वात आधी या गावात येतात, या दुकानात येतात आणि इथे सेल्फी घेतात. यानंतर दुकानात मिळणारा चहाचा आस्वाद नक्की घेतात. येथे अतिशय चविष्ट मॅगी मिळते, जे पर्यटक कधीही विसरत नाहीत.
फोटो ट्विट
आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या गावाचा फोटो शेअर केला आहे. या दुकानाजवळ उभे राहून चहा घेण्याची आणि सेल्फी घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. दुकानाचा फोटो पोस्ट करत आनंद महिंद्रा यांनी लोकांना विचारले, ‘हे देशातील सर्वोत्तम सेल्फी स्पॉट्सपैकी एक नाही का?’ आनंद महिंद्रा यांनी दुकानाच्या नावाचे कौतुक केले आणि लिहिले, की या ठिकाणी एक कप चहा पिणेदेखील अनमोल असेल.
One of the best selfie spots in India? An unmatchable slogan: “Hindustan ki Antim Dukan.” A cup of tea there is priceless. https://t.co/7dTxVlHwAG
— anand mahindra (@anandmahindra) February 9, 2022
आणखी वाचा :