Guinness World Record : कानावर लांबसडक केस वाढवून विक्रम करणारा अवलिया विक्टर

| Updated on: Dec 02, 2022 | 11:27 AM

नाव एन्थोनी विक्टर, निवृत्त शाळेचे हेडमास्तर! 2007 सालचा हा विक्रम आजही कुणी मोडू शकलेलं नाही

Guinness World Record : कानावर लांबसडक केस वाढवून विक्रम करणारा अवलिया विक्टर
विक्रमवीर विक्टर
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई : 2007 साली एक रेकॉर्ड अन्थोनी विक्टर (Anthony Victor) नावाच्या व्यक्तीने आपल्या नावावर केला. हा रेकॉर्ड (Guinness World Record) होता कानावर असलेल्या केसांच्या लांबीचा. सगळ्यात लांब केस (Longest Hair) कानावर ठेवणारी ही व्यक्ती एका शाळेचा हेडमास्तर म्हणून कामाला होती. या व्यक्तीच्या कानावरील केसांची लांबी सर्वाधिक असल्याची नोंद गिनिज बुकात घेण्यात आली. या भारतीय शिक्षकाने केलेला रेकॉर्ड आजही जगात दुसरं कुणी मोडू शकलेलं नाही.

एन्थोनी विक्टर यांच्या कानावर 18.1 सेंटीमीटर लांबीचे केस आहेत. म्हणजेच ही लांबी 7.12 इंच इतकी आहे. एवढे लांब केस कानावर ठेवण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. हा विक्रम 2007 साली करण्यात आला होता. तो आजही म्हणजेच 15 वर्षांनंतरही त्यांच्याच नावावर कायम आहे.

गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवरुन एन्थोनी विक्टर यांच्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. इअर हेअर्ड टीचर म्हणून विक्टर ओळखले जातात. त्यांनी इतक्या वर्षात एकदाही कानावरचे केस कापलेले नाही. काही जण ही गोष्ट कळल्यावर चकीत झाले, तर काहींना विक्टर यांच्याबद्दल कुतूहल वाटतंय.

एन्थोनी विक्टर यांचे केस किती लांबीचे आहेत, हे मोजतानाचे फोटोही गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहेत. काहींनी एन्थोनी यांनी कानावर वाढवलेल्या केसांची खिल्लीही उडवली आहे.

काही युजर्सनी कमेंट करत म्हटलंय की, एकवेळ मी दाढी करणार नाही, पण केंसावर केस काही वाढवणं माझ्याच्याने शक्य नाही. तर दुसऱ्या व्यक्तीने यापुढे नाकातील केस वाढवण्याचाही रेकॉर्ड नोंदवला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली आहे.