एका पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येसाठी दोषी ठरलेल्या कैद्या(Prisoner)चं चुंबन (Kiss) महिला न्यायाधीशा(Judge)ला महागात पडलंय. अर्जेंटिना(Argentina)तला हा प्रकार असून ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झालीय. मॅरीएल सुआरेझ असं या महिला न्यायाधीशाचं नाव असून दक्षिण चुबुत भागात तिचं वास्तव्य आहे. 29 डिसेंबर 2021 रोजी तिनं तुरुंगात क्रिस्टियन ‘मौ’ बुस्टोस नावाच्या कैद्याचं चुंबन घेतलं होते. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झालीय.
व्हिडिओ होतोय व्हायरल
एका वृत्तानुसार, एका आठवड्यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान हाच तो दोषी होता ज्याला जन्मठेपेपासून वाचवण्याचा प्रयत्न मॅरिएलनं केला होता. आता त्यांचा एक प्रायव्हेट व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) झाला आहे.
जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात मतदान करूनही कैदी भोगतोय शिक्षा
2009मध्ये अधिकारी लिआंद्रो ‘टिटो’ रॉबर्ट्सच्या हत्येसाठी बुस्टोसला जन्मठेपेची शिक्षा द्यायची की नाही हे ठरवणाऱ्या न्यायाधीशांच्या पॅनेलचा मॅरीएल भाग होती. त्या पॅनेलमध्ये ती एकमेव न्यायाधीश होती, जिनं बुस्टोसला जन्मठेपेच्या विरोधात मतदान केलं होतं. दुसरीकडे तो एक अत्यंत धोकादायक कैदी आहे, असे असतानाही मॅरिएलनं त्याच्या जन्मठेपेच्या विरोधात मतदान केलं होतं.
VIDEO DOCUMENTO.
AMIGOS ARGENTINA TOCO FONDO.
JUEZA QUE INTEGRO TRIBUNAL QUE CONDENO A PERPETUA AL ASESINO DE UN POLICIA EN CHUBUT, FUE HACERLE MATE Y MIMOS A LA PRISION AL CONDENADO. FUE SUMARIADA.
LA JUEZA SE LLAMA, MARIEL ALEJANDRA SUAREZ. pic.twitter.com/Gf07UEIA1H
— MARCELO FAVA (@MARCELOFAVAOK) January 4, 2022
शिस्तभंगाची कार्यवाही सुरू
मॅरिएलनं त्याला वाचवण्याचा प्रयत्न करूनही बुस्टोसला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तर दुसरीकडे तिच्या या वागणुकीबद्दल तिला विचारलं असता, आपण केसविषयी चर्चा करण्यासाठी त्याच्याकडे गेल्याची सारवासारव मॅरिएलनं केली. आपण त्याच्यावर एक पुस्तक लिहिणार असल्याचं तिनं म्हटलं होतं. चौकशी अधिकाऱ्यांना मात्र तिचं हे कारण काही पटलेलं नाही. या अयोग्य वर्तनाप्रकरणी तिच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.