मुंबई : सोशल मीडियावर (Social Media)अनेक व्हिडीओ व्हायरल (Snake Viral Video) होत असतात. त्यापैकी काही चांगले व्हिडीओ असतात, काही मजेशीर व्हिडीओ असतात, तर काही गंभीर व्हिडीओ असतात. सोशल मीडियावर कालपासून एक व्हायरल व्हिडीओ झाला आहे. तो व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु तो व्हिडीओ अनेकांनी शेअर केला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओला कमेंट देखील केली आहे.
दरवाजा उघडल्यानंतर अचानक दरवाज्याच्या फटीतून नाग बाहेर येतोय. तो नाग थेट फणा काढून दरवाज्यात उभा आहे. मोबाईलमध्ये त्याला कुणीतरी शूट करतंय. तो अजिबात घाबरलेला दिसत नाही. विशेष म्हणजे ज्या दरवाज्यात त्याने फणा काढला आहे. त्याच्या मागच्या बाजूला एक बाई सुध्दा दिसत आहे.
ज्याने व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केला आहे, तो अधिक धाडसाने केला आहे. कारण नाग अनेकदा फणा मारताना दिसतोय. त्याचबरोबर नागाने जागा सोडलेली नाही, किंवा पाहणाऱ्यांनी त्याला अजिबात तिथून हकलवून लावण्याचा प्रयत्न केलेला नाही.
The safest security system! ? pic.twitter.com/QwSesTD7HE
— Figen (@TheFigen_) December 26, 2022
@TheFigen ट्विटरच्या युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तो व्हिडीओ अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्याचबरोबर अनेकांनी तो व्हिडीओ पाहिला सुद्धा आहे.