नवी दिल्ली : परदेशातून येताना विमान प्रवासी अनेक वेळा कोणती ना कोणती वस्तू आठवण म्हणून सोबत आणतात. परंतू परदेशातून मौल्यवान वस्तू आणताना अनेक वेळा विमानतळावर प्रवासी अशा पद्धतीने त्या लपवून आणतात की विमानतळावर तपासणी करणारे अधिकारी देखील चक्रावून जातात. अनेक वेळा दुबईतून सोने आणताना प्रवासी अशा प्रकारच्या नवनवीन आयडीया वापरतात की विमानतळावरील अधिकाऱ्यांनाही त्यांच्या कौशल्यापुढे आपले सर्व प्रयत्न वापरावे लागतात. अशाच एका अबू धाबीवरून चेन्नई विमानतळावर आलेल्या प्रवाशाने एअरपोर्ट अधिकाऱ्यांना चांगलेच कामाला लावल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
विमानतळावर कर चुकवून मौल्यवान वस्तू आणि अमलीपदार्थांची तस्करी करणाऱ्यांना चाणाक्ष अधिकारी आपल्या कौशल्याने पकडत असतात. काही वेळा शरीराच्या नाजूक भागात वस्तू लपविल्या जातात. तर काहीवेळा आपल्या सोबत आणलेल्या सामानात या मौल्यवान वस्तू दडविल्या जात असतात. अशाच एका अबूधाबी वरून चेन्नईला आलेल्या एका व्यक्तीच्या तपासणीत अधिकाऱ्यांना चक्क 1796 ग्रामचे सोने अशा जागी लपवलेले आढळले की अधिकारी हैराण झाले.
कस्टम ड्यूटी चुकवण्यासाठी अनेक जण परदेशातून येताना मौल्यवान वस्तू अशा जागी लपवून आणतात की शोधताना पंचाईत होते. विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांना गुंगारा देण्यासाठी अनेक हातखंडे वापरले जात असतात. तरीही कस्टम अधिकारी त्यांच्या साऱ्या मेहनतीवर पाणी फेरतातच. असेच एक प्रकरण सोमवार तीन एप्रिल रोजी चेन्नई एअरपोर्टवर पहायले मिळाले आहे.
एका प्रवाशाचा सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न कस्टमच्या अधिकाऱ्यांनी उधळून लावला आहे. अधिकाऱ्यांना एका प्रवाशाचा संशय आल्याने त्याच्या सामानाची झडती घेण्यात आली. या प्रवाशाकडून लपविलेले 1796 ग्रामचे (1.796 किलोग्राम ) सोने जप्त करण्यात आले. त्याची किंमतच बाजारात 95.15 लाख इतकी आहे. या प्रवाशाने एका इलेक्ट्रीक मोटरमध्ये हे सोने लपविले होते. कस्टम एक्ट 1962 ( custom Act – 1962 ) अनूसार ही सोने जप्त करण्यात आले आहे.
#WATCH | Chennai Airport Customs intercepted a passenger who arrived from Abu Dhabi on April 3. On examination gold weighing 1796 gms valued at Rs 95.15 lakh concealed inside an electric motor was recovered and seized under the Customs Act, 1962.
(Video source: Customs) pic.twitter.com/ztDFlbmoCw
— ANI (@ANI) April 5, 2023
वृत्तसंस्था एएनआयने ट्वीटरवरील सोशल मिडीया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 49 सेंकदाचा हा सोने लपविल्याचा व्हिडीओ पाहून सोशल मिडीया युजर देखील हैराण झाले आहेत. सोन्याची तस्करी करणारे दरवेळी नवनवीन आयडीयाचा वापर करीत सोने लपवित असतात, परंतू अधिकारी देखील आपले कौशल्य वापरून हा तस्करीचा प्रयत्न उधळवून लावत असतात.