मुंबई : सोशल मीडियावर लग्नातील (Wedding Viral Video) अनेक व्हायरल व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यामध्ये असे काही व्हिडीओ असतात, की लोकं अधिक कौतुक करीत असतात. वऱ्हाडी मंडळी, नवरी, नवरा त्याचे आईवडिल यांचे सोशल मीडियावर (Social Media) लग्नातील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. खरंतर सोशल मीडियावर असे व्हिडीओ लोकांना पाहायला अधिक आवडतात असं दिसून आलं आहे. सध्या व्हायरल व्हिडीओ नेटकऱ्यांना अधिक आवडला आहे. एक महिला जबरदस्त नागिन डान्स करीत आहे. हा व्हिडीओ (Viral Video) पाहत असताना अनेकांचे डोळे सुध्दा त्यावरुन हटत नसल्याचं सांगत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये त्या महिलेने चांगला नागिन डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण दंग झाले आहेत. एखाद्या लग्नात पुरुषांपेक्षा महिला अधिक चांगल्या डान्स करतात. त्यामध्ये गावाकडच्या महिला सु्ध्दा मागे नाहीत. गावकडच्या महिलांचे सुध्दा लग्नात डान्स करीत असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती शेअर झाला आहे. इंस्टाग्रामवरती हा व्हिडीओ neha_ankit26 नावाच्या एका व्यक्तीनं शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला लग्नाच्या समारंभात डिजेच्या तालावर डान्स करीत आहे. या महिलेने जमिनीवर लोळून नागिन डान्स केला आहे. हा सगळा प्रकार पाहून नेटकऱ्यांचा आपल्या डोळ्यावर विश्वास राहिलेला नाही.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक तेजीने व्हायरल झाला आहे. हा व्हि़डीओ 46 हजार लोकांनी लाईक केला आहे. 2.6 मिलियन म्हणजेच 26 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकं त्यावर विविध प्रकारच्या कमेंट करीत आहेत. एका युझरने लिहीलं आहे की, ‘खरी नागिन’तर दुसरा नेटकरी म्हणतो की, त्या महिलेला होशमध्ये आणा. विशेष म्हणजे या व्हिडीओला अधिक लोकांनी कमेंट केल्या आहेत.