मुंबई : सोशल मीडियावर डान्सचे (Social media viral dance) व्हायरल व्हिडीओ नेहमी पाहायला मिळतात. कधी-कधी महिलांचा डान्स व्हिडीओ (viral dance) सुध्दा लोकांच्या पसंतीला पडतो. सध्या तसाचं एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक महिला तुफान डान्स करीत आहे. हा व्हिडीओ तुम्ही एकदा पाहिल्यानंतर पुन्हा-पुन्हा पाहणार एवढं मात्र नक्की आहे. व्हिडीओमध्ये एक महिला लाल साडीमध्ये डान्स (dance woman video) करीत आहे. हा डान्स व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा आंटीचं कौतुक करणार, तुम्हाला हा डान्स कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा.
व्हायरल होत असलेल्या त्या व्हिडीओमध्ये ती नाचत असलेली महिला नेपाळची आहे. तिथं महिला एका लग्नात डान्स करीत आहे. व्हिडिओमध्ये, लग्न समारंभात, एक सुंदर नेपाळी आंटी बॉलीवूड चित्रपट ‘सरगम’ मधील ‘डाफलीवाले डफली बाजा’ या सदाबहार गाण्यावर एका मुलासोबत सुंदर नृत्य करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये आंटीच्या डान्स स्टेप पाहून तुम्हालाही डान्स करायला भाग पडेल.
सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ शेअर केला आहे. everythingaboutnepal नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 25 लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर 71 हजार पेक्षा अधिक लोकांना त्या व्हिडीओला लाईक केले आहे. त्या व्हिडीओला विविध पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहेत. लोकांनी चांगल्या आणि मजेशीर अशा कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहीले आहे की, याला म्हणतात आमल्या धुंदीत राहणे.
अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लोकांना जे व्हिडीओ आवडतात, ते व्हिडीओ अधिक व्हायरल होताना
दिसतात.