भारतासारख्या देशात मनोजोगा सोबती मिळण्यासाठी तरुण आणि तरुणी दिवसभर सोशल मिडीयावर फोटो अपलोड करीत असतात. डेटींग एपची मदत घेत असतात. फेसबुक, इंन्स्टाग्रामवरुन प्रोफाईल फोटो बदलत असतात. तरीही खरं प्रेम मिळत नाही. काही जणांचे आयुष्यांच्या संध्याकाळ होते तरी त्यांना खरं प्रेम मिळत नाही. तर काही जणांना नाते संबंधात अडकून पडायचं नसते, परंतू त्यांना खऱ्या प्रेमाची भूक असते. अशा लोकांसाठी आपला शेजारील देश म्हणजे पर्वणी आहे. कारण काय तर चीनमध्ये पावलापावलांवर गर्लफ्रेंड भाड्यावर मिळण्याचे स्टॉल सजवलेले आहेत. शिवाय या मुलींनी आपले रेटकार्ड देखील छापलेले आहे. गर्लफ्रेंड भाड्याने देण्याचा हा धंदा चीनमध्ये मोठा बहराला आला आहे.
आपल्या भारतात लाखो तरुण मुल आणि मुली आयुष्याचा चांगला जोडीदार मिळावा यासाठी उपासतपास आणि जपजाप करीत असतात. कोणी सोळा सोमवार करीत असतात तर अन्य कोणी आणखी काही व्रतवैकल्य करीत असतात. परंतू आपला शेजारी असलेल्या चीनमध्ये गर्लफ्रेंड देखील चक्क भाड्याने मिळते. या गर्लफ्रेंडसाठी तुमाचा खिसा मात्र गरम असायला हवा. चीनमध्ये अशा प्रेमोत्सुक लोकांसाठी संधीच संधी आहे. तेथे अगदी चौकाचौकात भाड्याने गर्लफ्रेंड मिळत आहेत. भाड्याच्या गर्लफ्रेंडचा धंदा अगदी जोमाने सुरु आहे.या स्टॉलवर मुलींनी आपले रेडकार्ड देखील प्रदर्शनार्थ ठेवली आहेत. सर्वात म्हणजे प्रेमाच्या आणाभाका खाताने गर्लफ्रेंडला खूष करण्याचे सारे पर्याय येथे करुन पाहण्याची संधी अवघे काही रुपये खर्च करुन मिळत आहे.
समजा तुम्हाला एखाद्या तरुणीचा किस घ्यायचा असेल तर 115 रुपयात तुम्हाला किस देण्यास तरुणी मिळतात. जर तुम्हा केवळ हग करायचं आहे तर केवळ 11 रुपयात तरुणीला मिठी मारण्याची संधी मिळणार आहे. तर तुम्हाला मुलीला सिनेमा पाहायला सोबतीला न्यायचे असेल तर दीडेश रुपये खर्च करायची तयारी ठेवावी लागेल. शिवाय तुम्ही लंच किंवा डिनर सोबत करु इच्छीत असाल तर त्यासाठी आणखीन पैसे खर्च करायची तयारी तुम्हाला ठेवावी लागणार आहे.