बाबा वेंगा ही बल्गेरियातील गूढवादी भविष्यवेत्ता आहे. तिची भाकीतं अचूक ठरल्याचा दावा तिचे अनुयायी करतात. तिच्या भोवती अनेक गूढ कथांचे जाळे विणल्या गेले आहे. ती जन्मत:च अंध होती. पण ती काही तरी गूढ बोलायची. तिचे अनुयायी दावा करतात की तिला दैवी शक्ती प्राप्त होती. तिला दृष्टी नसली तरी भविष्यातील अनेक गोष्टी तिने दैवी शक्तीमुळे पाहिल्या. त्याविषयी ती पुटपुटत असायची. कधी कधी ठामपणे काहीतरी सांगायची. तिची कथन सत्य होऊ लागल्याचा दावा करण्यात येऊ लागला. आज जगभरात, इंटरनेटच्या दुनियेत तिच्या नावावर असंख्य भाकीतं करण्यात येतात. तीचं एक भाकीत म्हणजे मानवाचं मंगळावर पाऊल ठेवण्याचे स्वप्न दृष्टिपथात आहे. पण त्यापूर्वीच तिने एक इशारा देऊन ठेवला आहे…काय आहे वेंगाचे ते थरारक भविष्य…
मंगळ खुणावतोय
21 व्या शतकात मानवाला चंद्राहून मंगळ आणि गुरू ग्रह खुणावतोय. मंगळ ग्रहावर जीवन असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. नासा आणि इतर देशांच्या अंतराळ संस्था मंगळ ग्रहासाठी खास अभियान राबवत आहे. त्यात भारताची इस्त्रो सुद्धा मागे नाही. मंगळवर काही मोहिमा झाल्या. त्यात मंगळ ग्रहावर पाणी आणि सूक्ष्म जीव असल्याच्या खाणाखूणा मिळाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे वेंगाची भविष्यवाणी हलक्यात घेऊ नका, असे तिचे अनुयायी म्हणतात.
मंगळावर एलियन्स?
बाबा वेंगाच नाही तर अनेक खगोल अभ्यासकांनी मंगळवर मानवा व्यतिरिक्त कुणी तरी आहे, असा दावा यापूर्वी केला आहे. बाबा वेंगाच्या अनुयायांनी तर तिच्या भाकीताआधारे म्हणणे मांडले आहे की, मंगळ ग्रहावर एलियन्सची वसाहत आहे. मंगळावरील लाल मातीत तुम्हाला ते लपलेले दिसतील असा तिचा अंदाज असल्याचा दावा करण्यात येत आहे. अर्थात अजून मानवाचे पाऊल मंगळवार पडले नाही. यापूर्वीच्या मोहिमांमध्ये तसे काही आढळले नाही. पण ते लपलेले असल्याचा दावा बाबा वेंगाने केल्याचे तिचे अनुयायी सांगतात. नासासह अनेक वैज्ञानिक एलियन्सविषयी कोणतीही अधिकृत माहिती देत नसले तरी पृथ्वीसारखेच जीवन दुसर्या ग्रहावर असण्याची शक्यता असल्याचेही मान्य करतात.
मंगळ ग्रहावर मानवी वसाहत
रशिया, अमेरिका, चीन आणि भारतही अंतराळ मोहिमांमध्ये उतरला आहे. जगातील सर्व देश मिळून अंतराळासाठी खास मिशन राबवण्याची शक्यता आहे. त्यानुसार 2179 पर्यंत मानवाची मंगळ ग्रहावर वसाहत असेल असा दावा करण्यात येतो. सध्या नासा, स्पेसएक्स, इस्त्रो, चीन आणि रशियाची अंतराळ संस्था मंगळावर मानवी पाऊल टाकण्यासाठी योग्य वातावरण तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहे.
मंगळ ग्रहावरून पृथ्वीला धोका?
बाबा वेंगा हिच्या दाव्यानुसार मंगळ ग्रहावर एलियन्स लपलेले आहेत. त्यांची तिथे वसाहत आहे. मानवी संशोधनावर ते लक्ष ठेवून आहेत. मानव जेव्हा मंगळ मोहिम हाती घेईल. तिथे पाऊल ठेवले. तेव्हा हा खतरनाक जीव समोर येईल. तिथे रक्तरंजित युद्ध होईल. मंगळाची लाल माती लालेलाल होईल. या युद्धाचे परिणाम पृथ्वीपर्यंत जाणवतील. येत्या दहा वर्षांत मंगळसाठी पृथ्वीवरून मोहिमा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
डिस्क्लेमर : या दाव्यांबद्दल पुरेसे आणि ठोस पुरावे किंवा अधिकृत दस्तावेज उपलब्ध नाही. बाबा वांगा यांच्या भविष्यवाण्या साधारणतः अस्पष्ट आणि विविध अर्थांनी सांगण्यात येतात. हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.